• Download App
    Safe Search : पालकांना मिळणार मुलांचा सर्च इन्फो ! आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही Safe Search: Parents will get children's search info! Now Google will decide what kids will see and what they won't

    Safe Search : पालकांना मिळणार मुलांचा सर्च इन्फो ! आता Google चं ठरवणार लहान मुलं काय पाहतील आणि काय नाही

    • कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली : गुगल आता 18 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्ससाठी अनेक बदल करणार आहे. कंपनी गुगल अकाउंट्सबाबत बदल करणार आहे, जेणेकरुन लहान मुलांना ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवलं जाईल. अनेक पालक मुलांमध्ये वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे काळजीत आहेत. त्यामुळे गुगलच्या या निर्णयामुळे आता पालकांना काहीसा दिलासा मिळू शकतो.Safe Search: Parents will get children’s search info! Now Google will decide what kids will see and what they won’t

    टेक कंपनी गुगलने बुधवारी आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. कंपनी संवेदनशील कॅटेगरीतील जाहिराती (Sensitive Ads) अल्पवयीन मुलांना दाखवण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा उपायांचा विस्तार करेल, असं कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

    कंपनी 18 वर्षाहून कमी वय असलेल्यांसाठी लिंगाच्या आधारे जाहिरातींवर रोख लावेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही महिन्यात जागतिक स्तरावर हे अपडेट रोल आउट (Google Update) करण्यास सुरू करणार आहे. Google वर जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करणं हे लक्ष्य असून वयानुसार जाहिराती दाखवण्यात येणार आहेत.

    नियमानुसार, 13 वर्षाखालील मुलं एक स्टँडर्ड Google अकाउंट बनवू शकणार नाहीत. त्यांना लिमिटेड फीचर्ससह गुगल अकाउंट वापरण्याची सूट मिळेल. उदा. आता 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलं YouTube डिफॉल्ट अपलोडचा वापर करू शकतील.

    Google मुलांच्या सेफ्टीसाठी सेफ सर्च (Safe Search ) नावाचं फीचर आणणार आहे. यात मुलांचं गुगल अकाउंट कुटुंबियांसह लिंक असेल, ज्यात 13 वर्ष वयोगटातील मुलं साइन-इन करू शकतील. ते काय सर्च करतात, याची माहिती पालकांनाही मिळत राहील.

    Safe Search: Parents will get children’s search info! Now Google will decide what kids will see and what they won’t

     

    Related posts

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!

    गुजरात किनारपट्टीवर ATS ने 14 पाकिस्तानी पकडले, 602 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त!