- डिस्को आणि पॉप हा प्रकार त्यांनी हिंदीत आणला आणि हिट करून दाखवला. 80 आणि 90 चं दशक त्यांनी अक्षरशः गाजवलं आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांनी हिंदी आणि बंगाली संगीत क्षेत्रातही मोठं काम केलं होतं.
- बप्पी लहरी यांनी हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतही गाणी गायली आहेत. बप्पीदांना अनेक पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं आहे. 63 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात त्यांना संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी जीवन गौरव हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण यापैकी काही कलाकार असेही आहेत जे ट्रेंड सेटर ठरले आहेत. अशाच ट्रेंड सेटरपैकी प्रसिद्ध एक नाव म्हणजे ‘बप्पी लहिरी…’RIP BAPPI DA 💐: GOLDEN MAN BAPPI DA! ‘Bappida’ trend setter … everything from disco to gold! Do you know why he was wearing so many gold ornaments?
डिस्को डान्सर, प्यार बिना चैन कहाँ रे इथपासून ते अगदी लाख लाख लोक आके फस जाते हैं… असं सांगणारं मुंबईबाबतच गाणं असो. सगळीच गाणी लोकांच्या तोंडी आहेत. लता मंगेशकरांचाही आशीर्वाद त्यांना लाभला होता. हेच बप्पीदा ओळखले जात ते त्यांच्या खास वेशभुषेसाठी आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी.
बप्पी लहरी हे सोन्याचे इतके दागिने का घालत?
बप्पी लहरी हे सोन्याचे इतके दागिने का घालतात? हा प्रश्न कायमच सामान्यांना पडत होता. त्याचं उत्तर त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत दिलं होतं. मला इतके दागिने घालायला आवडतं कारण आहे एल्विस प्रेस्ली. एल्विस प्रेस्ली हा सोन्याची चेन घालतो हे मी पाहिलं होतं. त्यामुळे त्याच्याकडे पाहून मला ही प्रेरणा मिळाली की आपणही सोन्याचे दागिने घालावेत. जर मी आयुष्यात यशस्वी झालो तर माझी एक ओळख निर्माण करेन.
सोनं हे माझ्यासाठी भाग्यकारक अर्थात लकी आहे. त्यामुळेच मी सोनं वापरतो आणि माझी गाण्यासोबतच ही वेगळी ओळखही निर्माण झाली आहे, असं उत्तर स्वतः बप्पीदांनी दिलं होतं.
किशोर कुमार, लता मंगेशकर यांच्यापासून अगदी शानपर्यंत अनेक गायकांसोबत त्यांनी काम केलं आहे. लाख लाख लोग आके बस जाते हैं… त्यांच्या आवाजातलं गाणं आजही अनेकांच्या लक्षात आहे. तसंच आय अॅम डिस्को डान्सर हे गाणंही असंच लोकांच्या लक्षात आहे. रात बाकी, बात बाकी, यार बिना चैन कहाँ रे, उह लाला उह लाला ही आणि अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या तोंडावर आजही आहेत.
2020 मध्ये त्यांनी बागी 3 या सिनेमासाठी भंकस हे गाणं गायलं होतं हे त्यांचं शेवटचं हिंदी गाणं ठरलं. एक आँख मारू तो.. या गाण्याचा तो रिमेक होता.