• Download App
    राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरचे बुकिंग सुरू : पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची सेवा, पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे|Rakesh Jhunjhunwala's Akasa Air bookings open Mumbai-Ahmedabad, Bangalore-Kochi services in first phase, international flights from next year

    राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरचे बुकिंग सुरू : पहिल्या टप्प्यात मुंबई-अहमदाबाद, बंगळुरू-कोची सेवा, पुढील वर्षीपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे

    भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे पाठबळ असलेल्या अकासा एअर या विमानसेवेसाठी 22 जुलैपासून बुकिंगला सुरूवात झालेली आहे. 7 ऑगस्टपासून ही विमानसेवा सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई अहमदाबाद मार्गावर 26 फ्लाईट्स आणि बंगळुरू-कोची या मार्गावर आठवड्यात 28 प्लाईट्स असणार आहे.Rakesh Jhunjhunwala’s Akasa Air bookings open Mumbai-Ahmedabad, Bangalore-Kochi services in first phase, international flights from next year

    या विमानसेवेचे सर्वात कमी भाडे 3282 रुपये आहे. अकासा ही कमी किमतीत प्रवाशांना सेवा देणारी कंपनी ठरणार असून स्पाईसजेट, इंडिगो, गोफर्स्ट सारख्या कंपन्यांना थेट स्पर्धा देणार आहे. एअरलाइनचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी सांगीतले की, आम्ही तिकिटांची विक्री सुरू करण्यास अत्यंत उत्सुक आहोत.



    अकासा एअर मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुधवार वगळता नियमित सेवा देणार आहे. मुंबईहून सुटण्याची वेळ सकाळी 10:05 आहे. त्याचप्रमाणे अहमदाबादहून परतीचे विमान बुधवार वगळता दररोज दुपारी 12.05 वाजता राहणार आहे. मुंबईहून फ्लाइटचे तिकीट 4,314 रुपयांपासून सुरू होते. तर अहमदाबादहून विमानाचे तिकीट 3,904 रूपयांपासून सुरू राहील. मुंबई ते अहमदाबाद दुसरे विमान दुपारी 2 वाजून 5 मिनीटाला उड्डान करेल. अहमदाबादहून परतीचे विमान संध्याकाळी 4: 05 वाजता निघेल. मुंबईहून या फ्लाइटचे तिकीट 3,948 रुपयांपासून सुरू होते, तर अहमदाबादच्या फ्लाइटचे तिकीट 5,008 रुपयांपासून सुरू होते.

    अकासा एअर लाईन दुसरी विमान सेवा बंगलोर कोची मार्गावर दररोज सकाळी 7 वाजून 15 मिनीटांनी आणि सकाळी 11 वाजता बेंगळुरू ते कोची पर्यंत प्रवास करेल. त्याचे तिकीट 3,483 रूपयांपासून सुरू होतात. कोचीहून परतीचे विमान सकाळी 9:05 आणि दुपारी 01:10 वाजता निघेल. यासाठी तिकीटाची किंमत 3,282 रुपयांपासून सुरू होते.

    मोबाईल, बेबसाईटवरून बुकिंग शक्य

    मोबाइल अ‌ॅपवरून आणि कंपनीच्या वेबसाइटवरून www.akasaair.com, ट्रॅव्हल एजंटद्वारे फ्लाइट बुकिंग करता येणार आहे. एअरलाइनकडे ऑन-बोर्ड जेवण सेवा देखील आहे. जी कॅफे अकासा येथून बुक केली जाऊ शकते. कॅफे अकासा पास्ता, व्हिएतनामी राइस रोल्स, हॉट चॉकलेट आणि भारतीय पाककृती यासारख्या बाबी ऑफर केली जाणार आहे.

    पुढच्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय उड्डाण

    Akasa 2023 च्या उन्हाळा ऋतूत आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू करण्याची शक्यता आहे. या सेवेसाठी 20 विमानांचा समावेश असणार आहे. जे परदेशी मार्गांवर सेवेसाठी स्थानिक नियमांनुसार आवश्यक आहेत. सर्व Akasa 737 Max ला मध्य पूर्व, आग्नेय आशिया, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथे उड्डाण करण्याचा पर्याय असेल.

    Rakesh Jhunjhunwala’s Akasa Air bookings open Mumbai-Ahmedabad, Bangalore-Kochi services in first phase, international flights from next year

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!