कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं इथं चक्क भाजपच्या साथीनं शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे.
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं इथं चक्क भाजपच्या साथीनं शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. Rajapur pattern of Congress-NCP
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र तीनही पक्षांत आलबेल नाही, हे आत्तापर्यंत अनेक वेळा दिसून आले आहे. राजापूर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत तेच पाहायला मिळालं.
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं भाजप नगरसेवकाला हाताशी धरून शिवसेनेला धोबीपछाड केलं. या निवडणुकीत परवीन बारगीर आणि स्नेहा कुवेस्कर या आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली.
राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीला दिले होते. मग स्थानिक पातळीवर वेगळाच खेळ कसा रंगतो, असा प्रश्न राजापूरमधील शिवसेना नेत्यांना पडला आहे.
Rajapur pattern of Congress-NCP
मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत पूर्ण माहिती होती. त्यांच्या संमतीनेच ही आघाडी झाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या या माहितीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोईस्कर भूमिका घेत शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.