राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांना भेंडी कोठे येते हे तरी माहित आहे का? बटाटा जमिनीच्या खाली येतो का वरती हे त्यांना माहित नाही. त्यांचा शेती आणि शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. Rahul gandhi shivraj singh chauhan news
चौहान म्हणाले की, कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यांना शेती आणि शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना केवळ मोदींना विरोध करायचा आहे. लोकांच्यात संभ्रम पसरविण्याचे काम करायचे आहे. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही.
मध्य प्रदेशातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. मोदीजींना ऐकायचे आहे हीच चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सर्व प्रश्नांना उत्तरे दिली आहेत, असे चौहान म्हणाले. विरोधकांवर टीका करताना चौहान म्हणाले, या लोकांना वाटते की स्वत:चा एक डोळा फुटला तरी चालेल पण समोरच्याचे दोन्ही डोळे फुटले पाहिजेत. त्यामुळे कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. काही थोड्या शेतकऱ्यांना ते संभ्रमित करू शकतील, परंतु मध्य प्रदेशात त्यांचा डाव यशस्वी होऊ शकणार नाही. पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान निधीचा फायदा मिळू न देणाऱ्यांकडून शेतकरी हिताच्या गोष्टी केल्या जात आहेत.
Rahul gandhi shivraj singh chauhan news
ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमीनी हडपून पैसे कमाविले तेच राष्ट्रपतींना निवेदन द्यायला गेले तर त्यांचे ऐकणार कोण, असा सवाल करून शिवराजसिंह चौहान म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितले आहे की कृषी कायद्याबाबत कोणतीही शंका असेल तर चर्चा करायला तयार आहोत. परंतु, कृषी कायद्याला विरोध म्हणून हे आंदोलन नाही तर मोदींना विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.