लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या ९९.९ टक्के कार्यकर्त्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याच्या वल्गना करणाऱ्या काँग्रेसमध्ये निवडणुकीआधीच हुजऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी अध्यक्षपदासाठी राहुल गांधी हेच प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या ९९.९ टक्के कार्यकर्त्यांची राहुल गांधी हेच अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, अशी इच्छा असल्याचे ते म्हणाले. Rahul Gandhi randeep surjewala latest news
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी पक्ष नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीची चर्चा होणार असल्याचं समजतंय. या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी यांच्यासहीत पक्षातील ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. लवकरच पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचंही सुरजेवाला यांनी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.
Rahul Gandhi randeep surjewala latest news
काँग्रेसचं इलेक्टोरल कॉलेज, ऑल इंडिया काँग्रेस समितीचे सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते आणि सदस्य मिळून योग्य व्यक्तीची निवड पक्षाध्यक्ष म्हणून करतील. राहुल गांधी हेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून यावेत, ही माझ्यासहीत पक्षातील ९९.९ टक्के लोकांची इच्छा आहे, असंही सुरजेवाला यांनी यावेळी म्हटलं. मात्र, पक्षाचे अधिकृत प्रवक्ते असलेल्या सुरजेवाला यांनी पक्षाच्याच कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ९९.९ टक्के लोकांचा राहूल गांधी यांनाच पाठिंबा असल्याचे सांगितल्याने निवडणुका कशा पध्दतीने होणार याची चुणूक दिसत असल्याची टीका काँग्रेसच्या नेत्यांकडूनच होत आहे.