विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकार वर कठोर प्रहार करणारे राहुल गांधी हे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आपल्या आजोळी म्हणजे इटलीत गेल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कतार एअरवेजच्या विमानाने मिलान येथे गेले आहेत. राहुल गांधींच्या या कृतीवरून काँग्रेस पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. एवढेच नव्हे शेतकरी आंदोलनातील नेत्यांनीही ही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. Rahul Gandhi New Year celebration
राहुल गांधी यांच्यावर नेहमी आरोप केला जातो की, ऐन गरजेच्या वेळी ते गायब होतात. ज्या वेळी सरकारविरोधात भूमिका घेऊन नेतृत्व करण्याची संधी असले त्या वेळी नेमके राहुल गांधी कुठेच दिसत नाहीत. CAA च्या विरोधातल्या आंदोलनावेळी किंवा दिल्लीत दंगली झाल्या त्या वेळीही हेच दिसलं होतं.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसने अगदीच गुळमुळीत भूमिका घेतली. त्यांचं नेतृत्व सरकारला घेरण्यात कमी पडलं, असं नेहमी म्हटलं जातं. कोरूना मध्ये झालेल्या सप्टेंबरमधील पावसाळी अधिवेशनाला तर त्यांनी संपुर्णपणे दांडी मारली होती. ऐन बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतही ते बहीण प्रियांकासोबत सिमल्यात सुट्टीचा आनंद घेत होते.
Twitter वरून पंतप्रधान मोदींवर सदोदित हल्ला करणारे राहुल गांधी प्रत्यक्ष समोरासमोर पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याच्या वेळी मात्र गायब होतात. काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांच्या लेटर बाँबने पक्ष कार्यपद्धतीला सुरुंग लावल्याची घटना अजून ताजी आहे.
Rahul Gandhi New Year celebration
त्या लेटर बाॅंबमधील एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या परदेश दौऱ्यांचा आहे. राहुल गांधी रण सोडून अचानक पणे परदेशात जातात त्यामुळे पक्ष आणि कार्यकर्त्यांचे धाडस संपते, असे या बंडखोर नेत्यांचे म्हणणे असतानाही राहुल गांधी हे इटलीत गेले आहेत.