• Download App
    देशात मोदी नव्हे, तर अदानी; "सरकार" परस्पर बदलून टाकले राहुल गांधींनी!!|Rahul gandhi changed his political target, removed gun from Modi, trade it on adani

    देशात मोदी नव्हे, तर अदानी; “सरकार” परस्पर बदलून टाकले राहुल गांधींनी!!

    नाशिक : देशात मोदी नव्हे, तर अदानी; “सरकार” परस्पर बदलून टाकले राहुल गांधींनी!!, असे आज घडले. देशात लोकसभेच्या निवडणुका अजून 8 महिने लांब आहेत, पण त्यापूर्वीच राहुल गांधींनी काँग्रेस मुख्यालयातल्या एका पत्रकार परिषदेत देशातले “सरकारच” “बदलून” टाकले.Rahul gandhi changed his political target, removed gun from Modi, trade it on adani

    आत्तापर्यंत सर्वांचा समज होता की, देशात गेल्या नऊ वर्षांपासून मोदी सरकार आहे, पण ती वस्तुस्थिती नसून देशात अदानी सरकार चालू आहे. अदानी नंबर 1 वर आहेत. मोदी नंबर 2 वर आहेत आणि शाह नंबर 3 वर आहेत. ही क्रमवारी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत सांगितली.



    ॲपल कंपनीने म्हणे, देशातल्या विरोधी नेत्यांच्या आयफोनवर मेसेज पाठवला की, तुमचा फोन सरकारी यंत्रणा हॅक करत आहेत. या मुद्द्यावर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सगळा टीकेचा रोख मोदींऐवजी अदानींवर ठेवला.

    या पत्रकार परिषदेची सुरुवातच राहुल गांधींनी केली, ती राजाचे प्राण पोपटात असतात या गोष्टीने!!

    राहुल गांधी म्हणाले :

    देशातले लोक राजाच्या विरोधात बंड करत होते त्याच्या विरोधात आवाज उठवत होते. पण राजावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. अखेरीस एका ऋषींना लोकांनी विचारले की आम्ही एवढा सगळा विरोध करतो पण राजावर परिणाम का होत नाही??, तेव्हा ऋषींनी उत्तर दिले, त्या राजाचा प्राण आत्मा त्या राजामध्ये नाहीच. तो पलीकडे छोट्या खोलीतल्या पोपटा मध्ये आहे. आम्ही आता खरा पोपट पकडला आहे. देशात आतापर्यंत सगळ्यांना असे वाटत होते की, मोदीच देश चालवताहेत. देशात मोदी सरकार आहे, पण तसे बिलकुल नाही. देश अदानी चालवतात. देशात “अदानी सरकार” आहे आणि आम्ही त्याला बरोबर ओळखले आहे. देशातल्या सर्व समस्या या अदानींभोवतीच केंद्रित आहेत. कारण देशात अदानींची मोनॉपोली म्हणजे मक्तेदारी निर्माण केली गेली आहे. देशातल्या गरिबांचा, दलितांचा, आदिवासींचा, युवकांचा, महिलांचा सगळ्यांचा पैसा मोदी काढून घेतात आणि तो अदानींना देतात. देशातली प्रत्येक समस्येचे मूळ आदानीपर्यंतच येऊन पोहोचते अगदी जातनिहाय जनगणना हा मुद्दा देखील अदानींपर्यंतच येऊन पोहोचतो. देशात सर्व कंपन्या अदानींच्या मालकीच्या झाल्यात. देशातल्या निम्म्या मीडिया कंपन्यांचे मालक अदानी आहेत. देशातल्या किती मीडिया कंपन्यांचे मालक किंवा सीईओ दलित, आदिवासी पिछड्या वर्गातले आहेत??, याचा तुम्हीच विचार करा असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत हजर असलेल्या पत्रकारांना सुनावले.

    अदानींविषयी आपल्याला वैयक्तिक आकस नाही पण त्यांच्या मक्तेदारी विषयी नक्की प्रॉब्लेम आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

    पण आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त त्यांनी संपूर्ण देशाचा गेली साडेनऊ वर्षे पाळलेला गैरसमज दूर केला. तो म्हणजे देशात “मोदी सरकार” आहे. राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत त्या मोदी सरकारच्या अस्तित्वाचा इन्कार केला आणि देशात खरे मोदी सरकार नव्हेच. आहे ते “अदानी सरकार” आहे असे ठासून सांगितले.

    राहुल गांधींनी बदलला ट्रॅक!!

    राहुल गांधींनी राजाचे प्राण म्हणजे आत्मा पोपटात असतात ही जरी जुनी गोष्ट सांगून काही विनोद निर्माण केला असला, तरी राहुल गांधींनी यातून आपला राजकीय ट्रॅक बदलल्याचे समोर आले आहे. प्रशांत किशोर यांच्यासह अनेक निवडणूक रणनीतीकार राहुल गांधींना गेली नऊ वर्षे सांगत होते की तुम्ही मोदींना व्यक्तिगत टार्गेट करू नका. त्यातून काँग्रेसचा तोटा होतो, पण राहुल गांधी ते ऐकायला तयार नव्हते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका फक्त 8 महिने दूर असताना कदाचित राहुल गांधींनी त्या रणनीतीकारांचे ऐकायला सुरुवात केली असावी म्हणूनच राहुल गांधींनी आपला राजकीय ट्रॅक बदलला आणि मोदींना ऐवजी त्यांनी अदानींना नंबर 1 वर आणून ठेवले. अदानींना टार्गेट करायला सुरुवात केली. हे आजच्या पत्रकार परिषदेतले वेगळे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे कदाचित इथून पुढे राहुल गांधी आता मोदी सरकार नव्हे तर अदानी सरकार असा उल्लेख करून त्यांनाच टार्गेट करतील!!

    “अदानी सरकार” हटवण्याची आयडिया आहे, पण ती शेअर करणार नाही

    राहुल गांधींनी या पत्रकार परिषदेत देशात मोदी नव्हे तर अदानी सरकार आहे, असे उद्गार काढले त्यावरच एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, देशात मोदी सरकार असते तर ते मतदानाद्वारे हटविते आले असते, पण आता अदानी सरकार आहे असे तुम्ही म्हणता, तर ते तुम्ही कसे हटवाल??, त्यावर राहुल गांधींनी पत्रकाराला उत्तर दिले, प्रश्न अतिशय रास्त आहे, पण “अदानी सरकार” हटविण्याची देखील आपल्याकडे आयडिया आहे. पण इतक्यातच ती शेअर करणार नाही. योग्य वेळ येताच ती शेअर करण्याऐवजी तिची थेट अंमलबजावणी करू, अशी ग्वाही राहुल गांधींनी दिली पण आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने राहुल गांधींनी आपले मुख्य टार्गेट मोदींऐवजी अदानी केले. आता निदान यातून तरी काँग्रेसला अपेक्षित लाभ होणार का??, हा सवाल तयार झाला आहे.

    Rahul gandhi changed his political target, removed gun from Modi, trade it on adani

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस