- शिवसेनेने भाजपला मुक्ताईनगरात धक्का दिल्यानंतर आता त्याचा वचपा भाजपने माथेरानमध्ये काढला आहे. शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : माथेरान नगरपंचायतीत भाजपने शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत माथेरानच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.Push to Shiv Sena: 10 out of 14 Shiv Sena corporators in Matheran are in BJP; Power changed
आकाश चौधरी, उपनगराध्यक्ष
राकेश चौधरी, नगरसेवक
सोनम दाबेकर, नगरसेवक
प्रतिभा घावरे, नगरसेवक
सुषमा जाधव, नगरसेवक
प्रियांका कदम, नगरसेवक
ज्योती सोनवळे, नगरसेवक
संदीप कदम, नगरसेवक
चंद्रकांत जाधव, नगरसेवक
रुपाली आखाडे, नगरसेवक
माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या सह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. काल म्हणजेच बुधवारी भाजपच्या मुक्ताईनगरच्या आजी-माजी १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या १२ तासात भाजपने हा वचपा तिकडे माथेरानमध्ये काढला. १४ नगरसेवकांपैकी १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, शिवसेनेची सत्ताच पालटली आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.