वृत्तसंस्था
चंडीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. नवज्योत सिंग सिध्दू यांच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती नंतर त्या राजकीय वैरात अधिकच भर पडली आहे.Punjab CM Captain Amarinder Singh has warned against atrocious & ill-conceived comments by two of (state Congress chief) Navjot Sidhu’s advisors on sensitive national issues like Kashmir & Pakistan
नवज्योत सिंग सिध्दू यांनी प्रदेशाध्यक्षांना सल्ला देण्यासाठी काही नेत्यांची नेमणूक केली आहे. त्या सल्लागारांना मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज सटकावले. ज्या विषयांमध्ये आपल्याला नीट समजत नाही. जे विषय राष्ट्रीय आहेत, त्याबद्दल अनावश्यक वक्तव्ये करू नयेत, असे अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले.
नवज्योत सिंग सिध्दू यांचे सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी नुकतेच, “काश्मीर हा एक वेगळा देश आहे. तो भारत आणि पाकिस्तान यांनी बेकायदेशीररीत्या बळकावला आहे,” असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानावरूनच कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
मलविंदर सिंग माली यांच्या विधानावरून अकाली दलाचे नेते विक्रम मजीठिया यांनी देखील टीका केली होती. काश्मीर स्वतंत्र देश असल्याचे विधान करून काँग्रेस देशातील शहिदांचा अपमान करत आहे, असा आरोप मजिठीया यांनी केला होता. आता कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी देखील अशाच प्रकारे नवज्योत सिंग सिध्दू यांच्या सल्लागाराला सटकावल्यामुळे काँग्रेस मधली वैचारिक फूट देखील उघड्यावर आली आहे.
Punjab CM Captain Amarinder Singh has warned against atrocious & ill-conceived comments by two of (state Congress chief) Navjot Sidhu’s advisors on sensitive national issues like Kashmir & Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाची डेस्टीनेशन्स : मानवाप्रमाणेच संगणक वापरणार तर्क, संगणकाला अधिकाधिक बुद्धिमान बनवण्याचे प्रयत्न सुरू
- Corona Vaccination: महाराष्ट्रात ११ लाख नागरिकांचे विक्रमी लसीकरण; दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक डोस देणे शक्य असल्याचे स्पष्ट
- अफगाणिस्तानातून परतलेल्या नागरिकांना केंद्र सरकार मोफत पोलिओ डोस देणार
- मुलींची माहिती तालिबानच्या हातात पडू नये,शाळेच्या संस्थापकाने सर्व रेकॉर्डच टाकले जाळून