• Download App
    मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या Punishment for marrying a Muslim girl, murder by his wife's relatives in the street

    मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या

    मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबद्दल हा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.Punishment for marrying a Muslim girl, murder by his wife’s relatives in the street


    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याबद्दल हा खून करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपं स्कूटरवरून जात असताना सरूरनगरमध्ये भर रस्त्यावर हा खून करण्यात आला. विवाहित महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवलं. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या संशयितांनी मृत बिल्लीपुरम नागराजू यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले आणि आजूबाजूला अनेक लोक असताना त्यांच्या देखत नागराजू यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांनाही धमकावलं.नागराजू यांना भोकसून ठार करण्यात आलं, असं पोलिसांनी सांगितलं.


    Mansukh Hiren Murder : मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट


    नागाराजू आणि सय्यद अश्रीन सुलताना हे पती-पत्नी शालेय जीवनापासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी 31 जानेवारीला आर्य समाज, लाल दरवाजा इथे विवाह केला. जेव्हा या जोडप्याने लग्न करण्याचा आपला इरादा वारंवार व्यक्त केला तेव्हाही मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला.

    रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ले येथील मूळ रहिवासी असलेले नागराजू इस्लाम धर्म स्वीकारण्यासही तयार होते. परंतु, मुलीच्या कुटुंबीयांना हे नातंच नको होतं. सुल्ताना मूळची घणापूरची आहे. लग्नानंतर हे जोडपं पंजाला अनिल कुमार कॉलनी इथे भाड्याच्या घरात राहू लागलं. महिलेच्या कुटुंबीयांच्या धमकीच्या भीतीने ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे काही काळासाठी गेले होते आणि नुकतेच परतले होते. संशयित आरोपी सतत या दाम्पत्याच्या हालचालींचा माग काढत होते. अखेर त्यांनी भररस्त्यात नागराजू यांच्यावर हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    Punishment for marrying a Muslim girl, murder by his wife’s relatives in the street

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!