पुण्यातली नाईट लाईफ नेहमीच चर्चेत असते, अनेक हॉटेल, पब, बारमध्ये अनेक कार्यक्रमात लोकांची गर्दी होते, हीच गर्दी टाळण्यासाठी पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही,
विशेष प्रतिनिधी
पुणे : ओमायक्रॉनचा वाढता प्रसार पाहता जिल्ह्यात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी लेखी आदेश काढले आहेत. तसेच पुण्यासह ठाणे, नागपूरमध्येही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.PUNE: New regulations will be implemented in Pune district; what will be the new restrictions?
पुण्यात लग्न समारंभ, जिम, स्पा, रेस्टॉरंट, हॉटेल्स यांच्या वेळा आणि किती क्षमतेने परवानगी असणार याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे, तसेच राजकीय, धार्मिक कार्यक्रमात किती लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहेत नियम?
लग्न समारंभाला बंद जागेत 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी
लग्न समारंभाला मोकळ्या जागेत 250 जणांना परवानगी असणार
जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थिती
राजकीय, धार्मिक ,कार्यक्रमात 100 लोकांनाच परवानगी
रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत पुण्यात जमावबंदी लागू