विशेष प्रतिनिधी
कोलकाता :भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गांगुलीने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली. यामुळे गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गांगुलीने पश्चिम बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुकांसंदर्भातही भाष्य केले. Prince of Kolkata Saurabhdada will join in BJP
पश्चिम बंगालमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपकडून सौरभ गांगूलीला राजकीय आखाड्यात उतरवले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, गांगुलीने अद्याप यासंदर्भात कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. Prince of Kolkata Saurabhdada will join in BJP
अमित शाह यांनी कोलकाता दौऱ्यावर असताना बंगालचा भूमिपुत्रच बंगालचा मुख्यमंत्री होईल, असे सूचक विधान केले होते. त्यामुळे बंगालचा भूमिपुत्र सौरभ गांगुलीच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Prince of Kolkata Saurabhdada will join in BJP
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पश्चिम बंगाल दौरा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान अनेक लोक भाजपत प्रवेश करू शकतात. यावेळी गांगुलीदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. बीसीसीआयचे अध्यक्ष असलेले सौरभ गांगुली यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव सरचिटणीस आहेत.