नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) पुणे दौऱ्यावर येत आहेत. एरवी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मधूर संबंध बघता, शरद पवारांनी आज पर्यंत कधी केलेली नाही, अशी टिपण्णी करून घेतली आहे. पुणे मेट्रोचे काम अर्धवट असताना पंतप्रधान मोदी पुण्यात येऊन तिचे उद्घाटन करीत आहेत, असे ते म्हणाले आहेत…!! Prime Minister Modi’s visit to Pune is exactly where the NCP is spending …
- याचा नेमका अर्थ काय आहे…?? मेट्रोचे काम खरेच अर्धवट झाले आहे काय…??, की आणखी काही वेगळे कारण पवारांच्या टिपण्णीमागचे आहे…?? पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात वास्तविक पवारांना रीतसर निमंत्रण दिले गेले आहे. पण तरीही पवारांची आजची राजकीय टिपण्णी नेमकी कशातून आली आहे…??
- मेट्रोचे उद्घाटन महापालिकेत भाजपची सत्ता असताना होते आहे. त्यातही थेट पंतप्रधान मोदींनी कार्यक्रम घेतला आहे… त्यामुळे पवारांना आपण या कार्यक्रमाच्या केंद्रबिंदूवर असणार नाही, याची खंत वाटतेय का… की आणखी काही… पुण्याचे पान आपल्याशिवाय आता हालायला लागले आहे, याची जाणीव झाल्याने पवार अस्वस्थ झाले आहेत…
- त्यातही पंतप्रधान मोदींच्या पुण्यातल्या कार्यक्रमाचे “राजकीय टायमिंग” महत्त्वाचे आहे. उत्तर प्रदेशातला जंगी प्रचार दौरा संपवून पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होत आहेत. त्याचा उल्लेख ते नक्की आपल्या जाहीर भाषणात करणार आहेत. अशा वेळी आपल्या पुण्यातल्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसण्याची पवारांना भीती वाटते आहे का…
-या खेरीज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा…
- पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्याच्या मुठा नदी सुधार योजनेचे भूमिपूजन होत आहे… आणि या नदी सुधार प्रकल्पालाच राष्ट्रवादीचा खरा आक्षेप आहे. शरद पवारांनी या नदी सुधार प्रकल्पात जलसंपदा विभाग लक्ष घालेल असे म्हटले आहे. मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, या नदीवर किती धरणे आहेत… खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्या वरसगाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
- -त्यामुळे नदी सुधार योजनेचे भूमिपूजन झाले की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे, असे पवार म्हणाले आहेत.
- … आणि इथेच राष्ट्रवादीच्या आणि पवारांच्या नदी सुधार योजनेला असलेल्या विरोधाची राजकीय मेख आहे.
- एकीकडे मेट्रोचे उद्घाटन करून पंतप्रधान मोदी हे पुण्याच्या शहरी मतदारांवर प्रभाव टाकणार आणि दुसरीकडे नदी सुधार योजनेचे भूमिपूजन करून पुण्याच्या ग्रामीण मतदारांवर प्रभाव टाकणार… अशा स्थितीत पवारांच्या राजकीय अस्तित्वाचे नेमके काय होणार…??, ही भीती पवारांना भेडसावते आहे का…??
- शिवाय उद्याच्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी लवासाबाबत मुंबई हायकोर्टाने ओढलेल्या ताशेऱ्यांचा उल्लेख करू नये, यासाठी पवारांची ही धडपड सुरू आहे का…?? हा प्रश्न खरा गंभीर आहे… आणि नदी सुधार योजनेचा आढावा जलसंपदा विभागाला घ्यायला सांगून पंतप्रधान मोदी भूमिपूजन करत असलेल्या योजनेत संभाव्य अडथळा निर्माण करण्याचेही सूतोवाच पवारांनी करून घेतल्याचे दिसून येत आहे…!!
Prime Minister Modi’s visit to Pune is exactly where the NCP is spending …
महत्त्वाच्या बातम्या
- मैं मर जाऊंगा, मगर झूठ नहीं बोलूंगा; राहुल गांधी यांचा मोदींना टोमणा
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास फेटा; रविवारच्या पुणे दौऱ्यानिमित्त मोठी तयारी
- आठवड्यात युक्रेनवर ५०० क्षेपणास्त्रांनी हल्ला
- नाटो, युरोपीय महासंघानी घातले राशियासमोर शेपूट; युक्रेनच्या मदतीचा नुसताच आव; ठोस पावले नाहीत
- U. P. election – मी मेलो तरी चालेल, पण तुमच्या खात्यात १५ लाख रुपये भरण्याचे मी खोटे सांगणार नाही, राहुल गांधींची वाराणसीत टोलेबाजी