विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व शेतकऱ्यांनी वाचावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विरोधी पक्षाकडून भडकाविण्यात आल्याने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा भाषांत ट्विटरवर आवाहन केले आहे. कृषि मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र सर्व शेतकऱ्यांनी वाचावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
Prime Minister appeal to farmers in eleven languages including Marathi
पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कृषी मंत्र्यांनी शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्यांचा हा विनम्र संवादाचा प्रयत्न आहे. सर्व अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र जरूर वाचावे. देशवासियांनाही माझा आग्रह आहे की त्यांनी हे पत्र अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे.
शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करावं यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये ते म्हणतात की, कृषी कायद्यातील सुधारणांबाबत काही शेतकरी संघटनांनी एक भ्रम निर्माण केला आहे. देशाचा कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक शेतकऱ्याचा भ्रम दूर करणे, प्रत्येक शेतकऱ्याची चिंता दूर करणे माझे कर्तव्य आहे.
Prime Minister appeal to farmers in eleven languages including Marathi
सरकार आणि शेतकऱ्यामध्ये दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरात असत्याची भिंत उभी करण्यासाठीचा कट रचला जात आहे, त्याबाबत सत्य आणि योग्य वस्तुस्थिती आपल्या समोर ठेवणं ही माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.