पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांविरुध्द आंदोलन उभारल्याने सिंगूरपासूनच त्यांचा विजयरथ सुरू झाला होता. मात्र आता सिंगूरमध्येच ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सिंगूरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Preparations to surround Mamata Banerjee in Singur bjp amit shah
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्या पक्षांविरुध्द आंदोलन उभारल्याने सिंगूरपासूनच त्यांचा विजयरथ सुरू झाला होता. मात्र आता सिंगूरमध्येच ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सिंगूरमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. Preparations to surround Mamata Banerjee in Singur bjp amit shah
ममतांचा गड मानल्या जात असलेल्या नंदीग्राममधील तृणमूल कॉंग्रेसचे ताकदवान नेते सुवेंदु अधिकारी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का आहे. आता सिंगूरमध्येही अमित शहा यांचा दौरा होत असून यावेळी तृणमूलचा कोणता नेता भाजपमध्ये प्रवेश करतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या वाढत्या वर्चस्वाला कंटाळून तृणमूलचे अनेक नेते नाराज आहेत.
भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष महादेव सरकार यांनी सांगितले की सिंगूरमध्ये अमित शहा यांची भव्य सभा होणार आहे. त्याचबरोबर हावडा, हुगळी आणि २४ परगणा जिल्ह्यातही सभा होणार आहे.
सिंगूरमधील शेतकऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी सरकारविरुध्द प्रचंड संताप आहे. ममतांच्या केंद्राविरुध्द सुरू असलेल्या भांडणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दिला जाणारा किसान सन्मान निधी मिळत नाही. शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरूनही ममतांच्या सहीअभावी हा निधी अडलेला आहे.
Preparations to surround Mamata Banerjee in Singur bjp amit shah
दुसऱ्या बाजुला येथील शेतकऱ्यांच्या इतर समस्याही आहेत. ममतांनी उद्योगांच्या विरोधात आंदोलन उभारून शेतकऱ्यांना जमीनी परत दिल्या. मात्र, या जमीनींवर कोणेतही पिक येत नाही. शेती होत नाही, उद्योग सुरू नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. येथील स्थानिक आमदार रवींद्रनाथ भट्टाचार्य यांनीही ममतांच्या कारभाराविरुध्द नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनीही राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते.