प्रतिनिधी
पुणे – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. यात राजकारण वगैरे काही नाही. शरद पवारांना अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात, त्यापैकीच ही एक भेट होती, असा दावा अजित पवारांनी केला आहे. prashant kishor meets sharad pawara there is no politics, claims ajit pawar
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, की शरद पवार यांना वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेकजण वडीलकीच्या नात्याने भेटत असतात. त्या भेटींपैकीच ही एक भेट आहे. यात राजकारण वगैरे काही नाही.
आपल्या वक्तव्याच्या समर्थनासाठी अजित पवारांनी प्रशांत किशोर यांनी आधी केलेल्या विधानाचाच आधार घेतला. आपण कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी बंगालच्या निवडणूकीनंतर स्वतःच सांगितले आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील किंवा काही वेगळी काही कामं असतील म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील. प्रशांत किशोर यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कारण नाही, असा दावा अजित पवारांनी केला.
prashant kishor meets sharad pawara there is no politics, claims ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या
- म्युकरमायकोसीस मुळे होणारे मृत्यू नियंत्रणात आणा ; मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला खडसावले ; Amphotericin हे औषध योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश
- कुलभूषण जाधव यांना उच्च न्यायालयात दाद मागता येणार; पाकिस्तानची नरमाईची भूमिका
- तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी, राज्य सरकारचा निर्णय ; नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा