विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोवा, राजस्थान आणि हैद्राबाद येथील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढत चालला असून काँग्रेसचे हळूहळू पतन होत आहे, असे ट्विट केंद्रिय मंत्री प्रकाश जावडकर यांनी केले. Prakash jawadekar takes on Congress over panchayat elections
गोवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने 49 पैकी 32 जागा जिंकल्या तर काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. रा जस्थानात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. भाजपला 548 जागा, काँग्रेसला 620 तर इतर पक्षांना 595 जागा मिळाल्या होत्या.
ग्रेटर हैद्राबाद महापालिका निवडणुकीत भाजपने तब्बल 45 जागा पटकावल्या होत्या. तेलंगणा राष्ट्र समितीने 55 तर एआयएमआएमने 44 जागा जिंकल्या होत्या.
Prakash jawadekar takes on Congress over panchayat elections
या निवडणुकीच्या नाकावर भाष्य करताना जावडेकर यांनी ट्विट केले. या तीन राज्यातील निकालाची आकडेवारी पाहता भाजपची ताकद वाढत असून काँग्रेस दुबळी होत चालल्याचे दिसते.