• Download App
    क्रूरकर्मा औरंगजेबने कपटाने मारलेल्या गुरू तेगबहादूर यांना मोदींचे गुरुद्वारा रकाबगंजमध्ये जाऊन नमन | The Focus India

    क्रूरकर्मा औरंगजेबने कपटाने मारलेल्या गुरू तेगबहादूर यांना मोदींचे गुरुद्वारा रकाबगंजमध्ये जाऊन नमन

    • पंजाबी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेच दिल्लीतील गुरुद्वारामध्ये टेकविला माथा
    • पहाटेच दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंजला ‘अनियोजित’ भेट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे अचानक रकाबगंज गुरुद्वारामध्ये दाखल होऊन माथा टेकत गुरू तेगबहादूर यांना नमन केलं. रायसीना हिल्सच्या मागच्या बाजुला स्थित असणाऱ्या या गुरुद्वारामध्ये गेल्या २५ दिवसांपासून ‘शीख समागम’ सुरू आहे.

    narendra modi visited gurudwara rakabganj, pays tribute to guru teg bahadur

    उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते.

    पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.

    पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली. इंग्रजीसोबतच पंजाबी भाषेतही ट्विट करण्यात आले. जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटले. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणाने मलाही खूप प्रेरणा दिली आहे’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केलीय.

    ‘आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरु तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू’ असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

    narendra modi visited gurudwara rakabganj, pays tribute to guru teg bahadur

    मुघलांशी संघर्ष आणि बलिदान
    गुरु तेग बहाद्दूर यांचा आज बलिदान दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुद्वारा राकब गंज साहिबला पंतप्रधान मोदी यांनी आज भेट दिली आणि गुरूंना आदरांजली वाहिली. 1621 मध्ये तेग बहाद्दूर यांचा अमृतसर येथे जन्म झाला होता. गुरु हरगोविंद यांचे ते पुत्र होते. 1665 ते 1675 पर्यंत ते शिखांचे गुरु होते. गुरुग्रन्थसाहिबमध्ये त्यांच्या 115 ओव्या आहेत. गुरू तेग बहाद्दूर यांनी मुघलांशी संघर्ष केला होता. क्रूरकर्मा औरंगजेबाने कपट करून गुरू तेगबहाद्दूर यांना ठार मारले होते. सध्याच्या गुरुद्वारा राकब गंज साहिब आहे तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले होते.

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??