• Download App
    PM Narendra Modi : चक्क मराठीतून पंतप्रधान म्हणाले 'गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...PM Narendra Modi: The Prime Minister said in Marathi, 'Happy Ganeshotsav ...'...

    PM Narendra Modi : चक्क मराठीतून पंतप्रधान म्हणाले ‘गणेशोत्सवाच्या शुभेच्छा…’

    विशेष प्रतिनिधी 

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर आज सगळीकडेच ऐकू येतो आहे. राज्यात कोरोनाचं संकट असलं तरीही गणरायाची प्रतिष्ठापना आणि त्याबाबतचा उत्साह चांगलाच दिसून येतो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.PM Narendra Modi: The Prime Minister said in Marathi, ‘Happy Ganeshotsav …’

    आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!”, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

    देशभरातील गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे करोनाचा धोका देखील कायम आहे. राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे.

    PM Narendra Modi: The Prime Minister said in Marathi, ‘Happy Ganeshotsav …’

    Related posts

    Ebola : इबोला संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत-आफ्रिकन संघ शिखर परिषद पुढे ढकलली

    Delhi University : दिल्ली विद्यापीठाच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये मध्यरात्री आंदोलन; विद्यार्थिनींचा व्यवस्थापनावर आरोप

    Calcutta High Court : कलकत्ता न्यायालयाने म्हटले-बकरी ईदला गाईची कुर्बानी आवश्यक नाही; बंगालमध्ये पशुवध नोटिशीवर बंदी घालण्यास नकार