- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे . कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला मदत करण्यासाठी पुढे आलेल्या अनेक देशांपैकी एक म्हणजे रशिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पुतीन यांच्याशी ट्विटरवर झालेल्या संभाषणाची माहिती दिली आहे.
- रशियाकडून कोरोना लस स्पुतनिक-व्ही पुरवठा करण्याचे आश्वासन भारताला देण्यात आले आहे. या लसीचा पुरवठा १ मेपासून देशात सुरू होणार आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा कहर वाढू लागला असून, मदतीसाठी आता जगातील अनेक देश पुढे आले आहेत.वसुधैव कुटुंबकम् असे माननार्या भारताच्या पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जगाला कठिन परिस्थितित लसीचा पुरवठा केला .त्याचाच हा सकारात्मक परिणाम असेच म्हणावे लागेल .PM Modi speaks to Russian President Vladimir Putin, thanks him for Russia support in India’s fight against Covid
युरोपीय समुदायातील सदस्य देश भारताला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांसह इतर वैद्यकीय साहित्याची मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत.
त्यामध्ये रशियाचा देखील समावेश असून स्पुटनिक व्ही ही रशियन लस भारताला पुरवण्यासाठी रशियन सरकारने सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर पंतप्रधानांनी ट्विटरवरून पुतिन यांचे आभार मानले आहेत. तसेच, दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी मंत्री स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी ट्विटर हँडलवरून व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली. “आज माझे मित्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी उत्तम संभाषण झालं. आम्ही कोविड-१९ च्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. करोनाच्या साथीविरोधात भारताच्या सुरू असलेल्या लढ्याला मदत केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानतो”, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, दोन्ही देशांमधल्या सहकार्यावर देखील या कॉलमध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांविषयी देखील चर्चा केली. यात प्रामुख्याने अंतराळ संशोधन आणि अक्षय्य ऊर्जा क्षेत्राविषयी देखील चर्चा झाली. या संकटाविरुद्धच्या लढ्यामध्ये स्पुटनिक व्ही लसीबाबत झालेलं आमचं सहकार्य नक्कीच मानवजातीला मदत करेल. रशिया आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला अधिक बळ मिळण्यासाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये मंत्रीस्तरावर चर्चा सुरू करण्यावर सहमती केली आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.
भारतात गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशात ऑक्सिजन, रेमडेसिविर, लस यांचा तुटवडा जाणवत असताना जगातील अनेक देशांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, फ्रान्स, युरोप, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, सिंगापूर, युएई या देशांनी आत्तापर्यंत भारताला मदत करण्याचं धोरण जाहीर केलं असून त्यासाठी सक्रीय पुढाकार देखील घेतला आहे. भारतात करोनाचा वेगाने प्रसार होऊ लागला असून शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन या देशांकडून दिलं जाऊ लागलं आहे.
PM Modi speaks to Russian President Vladimir Putin, thanks him for Russia support in India’s fight against Covid