• Download App
    देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वादच शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना पराभूत करेल, पंतप्रधानांचा विश्वास | The Focus India

    देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वादच शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना पराभूत करेल, पंतप्रधानांचा विश्वास

    आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, अडचणी कमी व्हाव्यात, त्यासाठी सतत काम केले. मला देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळाले. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या आशिर्वादाची शक्ती या मुद्द्याचे राजकारण करणाऱ्यांना आणि जे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहेत, त्यांना पराभूत करेल,असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. pm modi latest news

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, अडचणी कमी व्हाव्यात, त्यासाठी सतत काम केले.

    मला देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळाले केले. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या आशिर्वादाची शक्ती या मुद्द्याचे राजकारण करणाऱ्यांना आणि जे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना पराभूत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. pm modi latest news

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छमध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी बनवणाऱ्या (डिसॅलिनेशन) प्लांट, देशातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आणि स्वयंचलित दूध प्रक्रिया युनिटची पायाभरणी केली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून कृषी सुधारणांची मागणी केली जात होती. अनेक शेतकरी संघटना देशातील कोठेही धान्य विकण्याचा पर्याय द्यावा अशी मागणी करत होते. pm modi latest news

    सरकारमध्ये असताना विरोधी पक्षात बसलेल्या लोकांना हे पाऊल उचलता आले नाही. आमच्या सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले तेव्हा विरोधकांनी शेतकऱ्यांना भडकावण्यास सुरुवात केली.

    आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सज्ज आहोत. शेतीवरील खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, अडचणी कमी व्हाव्यात, त्यासाठी सतत काम केले. मला देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे आशिर्वाद मिळाले केले. मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या आशिर्वादाची शक्ती या मुद्द्याचे राजकारण करणाऱ्यांना आणि जे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांना पराभूत करेल.

    pm modi latest news

    कच्छच्या मांडवी येथे डिसॅलिनेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. याद्वारे दररोज 10 कोटी लिटर समुद्राचे पाणी पिण्याच्या पाण्यात बदलले जाणार आहे. गुजरातमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याद्वारे परिसरातील सुमारे 8 लाख लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येईल. गुजरातमधील पाच डिसॅलिनेशन प्लांटपैकी हा एक प्रकल्प आहे. असेच प्रकल्प दाहेज, द्वारका, घोघा भावनगर आणि गिर सोमनाथ येथे उभारण्यात येत आहेत.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…