• Download App
    पिंपळाची पाने बहुगुणी,औषधी घटकांनी युक्त, ऑक्सिजन वाढविणारी ; फ़ुफ्फुसासाठी वरदान Pimple leaves are versatile, rich in medicinal ingredients

    पिंपळाची पाने बहुगुणी,औषधी घटकांनी युक्त, ऑक्सिजन वाढविणारी ; फ़ुफ्फुसासाठी वरदान

    विशेष प्रतिनिधी

    अश्वत्थ वृक्ष (पिंपळ) आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व या वृक्षाला भरपूर आयुष्य असते. त्यामुळे त्याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव. ज्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या विशिष्ट वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ म्हटले जाते. अशा पिंपळ वृक्षाच्या पानाचे आयुर्वेदिक औषधात मोठे महत्व आहे. Pimple leaves are versatile, rich in medicinal ingredients

    ऑक्सिजन पातळी वाढते

    दररोज दोन पिंपळाच्या पानांचे सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढू शकते. तसेच या वृक्षाखाली बसल्यास भरपूर ऑक्सिजनही प्राप्त होतो.

    पिंपळाच्या पानात पोषक घटक

    दोन पिंपळ पाने दररोज खावीत, असे तज्ज्ञ सांगतात. पानात मॉइश्चर सामग्री, कार्बोहायड्रेट, प्रथिने, चरबी, फायबर, कॅल्शियम, लोह, तांबे आणि मॅग्नेशियमचे घटक असतात. ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त असतात. पानाचा आकार हा हृदयासारखा असल्याने ती हृदयासाठी वरदान असतात, असे तज्ञाचे मत आहे.

    फुफ्फुसांसाठी अत्यंत फायदेशीर

    फुफ्फुसांच्या मार्गात सूज येणे आणि घट्टपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला यावर उपाय म्हणून पिंपळ पानांचे सेवन करू शकता. पानातील घटकांत विशेष औषधी गुणधर्म आहेत. जी खोकल्यावर रामबाण असतात.

    रोग प्रतिकारशक्तीही वाढते

    पिंपळाची पाने रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. कोरोनाच्या संसर्गात प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याची चिंता भेडसावते. यासाठी गिलोय आणि पिंपळ पानांचे मिश्रण पाण्यात टाकून उकळा. हे मिश्रण थंड झाल्यावर दिवसातून चार वेळा त्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.

    यकृत बनेल दणकट

    अति मद्यपान केल्याने यकृतावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे यकृत निरोगी राहण्यासाठी पिंपळ पान खात रहावे. पिंपळ पानात यकृताचे नुकसान भरून काढण्याची ताकद असते. यकृत रुग्णांनी दररोज सकाळी पिंपळची दोन पाने खावीत.

    कफ नाहीसा करण्याची क्षमता

    कफ कमी करण्यासाठी पिंपळाचे पान उपयुक्त आहे. पिंपळ पानाचा रस काढून घेतल्यास कफ कमी होईल.
    पाने वाळवून घ्या आणि गाईच्या तुपासोबत सेवन केल्यास फायदा होईल.

    Pimple leaves are versatile, rich in medicinal ingredients

    Related posts

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!