• Download App
    केरळात मंत्रिमंडळाच्या स्टेडियममधल्या शपथविधीविरोधात वकीलाचे साकडे; suo motu कारवाईसाठी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिले पत्र|A lawyer writes to Kerala HC Chief Justice asking to take up suo motu proceedings against swearing-in ceremony of the Kerala govt 'to protect lives of citizens'

    केरळात मंत्रिमंडळाच्या स्टेडियममधल्या शपथविधीविरोधात वकीलाचे साकडे; suo motu कारवाईसाठी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिले पत्र

    वृत्तसंस्था

    तिरूअनंतपूरम – कोविडचा फैलाव आणि चक्रीवादळ यांच्या प्रकोपाशी केरळची जनता झुंजत असताना राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीला आपल्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा सार्वजनिक पातळीवर साजरा करणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. या विरोधात एका वकीलाने हायकोर्टाला साकडे घातले आहे.A lawyer writes to Kerala HC Chief Justice asking to take up suo motu proceedings against swearing-in ceremony of the Kerala govt ‘to protect lives of citizens’

    देशात सगळीकडे सामान्य नागरिकांच्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लावले असताना केरळमध्ये येत्या २० तारखेला पिनरई विजयन यांनी आपल्या सरकारचा शपथविधी सेंट्रल स्टेडियममध्ये करण्याचा घाट घातला आहे.



    यासाठी कोविड मर्यादा म्हणून “फक्त ५०० जणांनाच” शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची मखलाशी देखील पिनरई विजयन यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

    अर्थात, या विरोधात केरळ हायकोर्टाने स्वयंस्पष्ट suo motu याचिका दाखल करून घ्यावी, असे पत्र एका वकीलाने हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना लिहिले आहे.

    सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यास किंवा अन्य धार्मिक, सामाजिक सोहळ्यास फक्त ५० जणांच्या उपस्थितीचे बंधन देशात घालण्यात आले आहे.

    पण केरळच्या डाव्या आघाडीचे सरकारचे मंत्री मात्र स्वतःपुरता अपवाद करून २० तारखेला दुपारी ३.३० वाजता सेंट्रल स्टेडियममध्ये ५०० जणांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहे. दस्तुरखुद्द पिनरई विजयन यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

    याची दखल घेऊन हायकोर्टाने जनतेच्या जीविताचा हक्क आणि बचाव या मुद्द्यावर आधारित याचिका दाखल करून केरळ सरकारला शपथविधीचा सार्वजनिक समारंभ करण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी या वकीलाने आपल्या पत्रात केली आहे.

    एकीकडे केरळची जनता कोविडशी झुंजते आहे. दुसरीकडे चक्रीवादळानेही थैमान घातले आहे आणि डाव्या आघाडीचे नेते नव्या सरकारच्या सार्वजनिक शपथविधी सोहळ्याची तयारी करीत आहेत त्यांना रोखण्यासाठी वकीलाने हे पत्र लिहिले आहे.

    A lawyer writes to Kerala HC Chief Justice asking to take up suo motu proceedings against swearing-in ceremony of the Kerala govt ‘to protect lives of citizens’

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    संदेशखालीमध्ये CBIची NSG कमांडोसह झाडाझडती; अनेक ठिकाणी शस्त्रे व दारूगोळा सापडला

    विजय माल्ल्याला फ्रान्सच्या माध्यमातून परत आणण्याची तयारी; भारताने बिनशर्त प्रत्यार्पण मागितले

    खेळाडूंची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी पीसीबीचा अजब फॉर्म्युला; पाक क्रिकेटपटूंना कठोर लष्करी प्रशिक्षण, डोंगर चढायला लावले, 3 जखमी