शेकडो वर्षांनी आला ‘हा’ दुर्मिळ योग, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप.विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध दरवळला.PHOTO: Favorite constant meditation! Mogra blossomed in Pandharpur; Today, on the occasion of Triprisha Mahadvadashi, the charming form of Vitthal-Rukmai
विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : मोहिनी भागवत एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली . विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात मोगर्याचा सुगंध दरवळला . PHOTO: Favorite constant meditation! Mogra blossomed in Pandharpur; Today, on the occasion of Triprisha Mahadvadashi, the charming form of Vitthal-Rukmai
त्रिस्पृशा महाद्वादशीनिमित्त आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अत्यंत सुरेख अशी सजावट करण्यात आली. पाहा याचे काही खास फोटो.
आज अश्विन शुद्ध एकादशी अर्थात मोहिनी एकादशी या दिनाचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीद्वारे मंदिरात आकर्षक अशा सुवासिक मोगऱ्याच्या फुलांच्या पडद्यांची सजावट करण्यात आली आहे.
आज एक असा मुहूर्त आहे की ज्याचा योग हा शेकडो वर्षातून आला आहे.आजची एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे.याच दुर्मिळ योगाला त्रिस्पृशा महाद्वादशी असे म्हणाले जाते.आज पहाटे पावणेसहा वाजेपर्यत मोहिनी एकादशी ,नंतर दिवसभर द्वादशी आणि मध्यरात्रीपासून त्रयोदशीला सुरुवात होत आहे.
सजावटीसाठी तब्बल 300 किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.सजावट पुण्याच्या रांजणगावचे भक्त नानासाहेब दिनकर पंचुदकर पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे. आराशीसाठी वापरलेली झेंडू, मोगरा, गुलाब, आष्टर अशी अनेक प्रकारची सुमारे ऐंशी हजार रुपये किंमतीची तीनशे किलो फुले देण्यात आली आहेत. कुमार शिंदे, फ्लाॅवर डेकोरेटर पुणे य़ांनी मंदिरातील हे डेकोरेशन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी मंदिरातील नित्योपचार नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
फोटो सौजन्य – विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
PHOTO: Favorite constant meditation! Mogra blossomed in Pandharpur; Today,on the occasion of Triprisha Mahadvadashi, the charming form of Vitthal-Rukmai