वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानातील लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेबाबत भारताने कठोर भूमिका घेतली असून पाकिस्तानातील हिंदू, शीख आणि अन्य धर्मियांच्या सुरक्षेकडे काटेकोर लक्ष द्यावे, अशी तंबी दिली आहे. Pay attention to security of Hindu-shikh minorities, India slams Pakistan after desecration of statue of Maharaja Ranjit Singh
अगोदर हिंदू मंदिरावर हल्ला करून तोडफोड आणि नंतर रणजित सिंह यांच्या पुतळ्याची केलेली विटंबना हा प्रकार अतिशय निंदनीय आहे, असे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
पुतळ्याची विटंबना हा पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारश्यावर हा थेट हल्ला आहे. किंबहुना हा हल्ला म्हणजे अल्पसंख्याक लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे द्योतक आहे.
१२ दिवसांपूर्वी हिंदू मंदिरावर झालेला हल्ला आणि तोडफोड. अल्पसंख्याक लोकांच्या प्रॉपर्टीवर हल्ला करून तोडफोड करणे, हे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढत आहेत. हा प्रकार धोक्याची घंटा असल्याचे बागची म्हणाले.
पाकिस्तान सरकार अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे. पाकिस्तान सरकारने अल्पसंख्यकांच्या प्राणाची, मालमत्तेची आणि सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन बागची यांनी केले.
पाकिस्तानात वारंवार महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. ही बाब निंदनीय आहे. याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे. पाकिस्तानी सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी. जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत.
– जे. पी. नड्डा, अध्यक्ष, भाजप
Pay attention to security of Hindu-shikh minorities, India slams Pakistan after desecration of statue of Maharaja Ranjit Singh
विशेष प्रतिनिधी
- मोदीजी, अफगाणिस्तानातील गरीब, महिला आणि मुलांना वाचवा; सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या नातीचा टाहो
- पाकच्या लाहोरमधील महाराज रणजित सिंह यांच्या पुतळ्याची विटंबना; शिखांमध्ये संतापाची लाट
- अफगाणिस्तानाचे परागंदा अध्यक्ष अश्रफ घनी यांना कोणता देश आश्रय देणार? साऱ्या जगाचे लागले लक्ष
- तालिबानवरून अमेरिकेत सुरु झाले राजकारण, डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांना घेतले फैलावर