पाकिस्तानी सैन्याने १९७१ मध्ये बांग्ला देशात दोन लाख महिलांवर बलात्कार केला होता. ३० लाखांहून अधिक लोकांना ठार मारले. मानवी इतिहासातील हा सर्वाधिक क्रुर अध्याय होता. या सगळ्या पीडितांना जगाने श्रध्दांजली वाहावी, असे आवाहन भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याने १९७१ मध्ये बांग्ला देशात दोन लाख महिलांवर बलात्कार केला होता. ३० लाखांहून अधिक लोकांना ठार मारले. मानवी इतिहासातील हा सर्वाधिक क्रुर अध्याय होता. या सगळ्या पीडितांना जगाने श्रध्दांजली वाहावी, असे आवाहन भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघात करण्यात आले आहे. Pakistani army raped 2 lakh Bangladeshi women
आंतरराष्ट्रीय नरसंहार विरोधी दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजदूत टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मानवी इतिहासातील सर्वात भीषण नरसंहार बांगला देशात झाला होता.
१९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने बांगला देशातील सर्वसामान्य जनतेवर अमानुष अत्याचार केले. खुलेआम नागरिकांना ठार मारले जात होते. महिलांवर सामुहिक बलात्कार करण्यात येत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तब्बल 2 लाख महिलांवर बलात्कार केला. या वेळी झालेल्या संघर्षात 30 लाख नागरिक ठार झाले. 80 लाख ते एक कोटी नागरिकांनी भारतात शरणागती घेतली होती.
पाकिस्तानी लष्कराने पश्चिम पाकिस्तानमध्ये जनतेवर अमानुष अत्याचार चालवला होता. त्यामुळे भारताला पाकिस्तानी लष्करावर हल्ला करावा लागला होता. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले युद्ध बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याच्या स्वरुपात लढण्यात आले. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागले गेले होते.
Pakistani army raped 2 lakh Bangladeshi women
पूर्व भागातील पाकिस्तानवर पश्चिम भागातील नेत्यांचा अंमल चालत होता. त्यांच्यावर भाषेसंदर्भात आणि सांस्कृतिक बंधने लादण्यात आली होती. याविरुद्ध पूर्व पाकिस्तानमध्ये निदर्शने करण्यात येत होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी पाकिस्तानी सरकारने लष्कराला खुली सूट दिली होती.