- पुणे येथील दाम्पत्याची १७ वर्षाची मुलगी आज हयात नसली तरी तिच्या अवयवांमुळे आज तब्बल सहा जणांना जीवदान मिळाले आहे.
- श्रुती बाबुराव नरे असे तीचे नाव असून ती आज हयात नसली तरी सहा जणांच्या रुपात आजही ती आपल्या आई-वडिलांसोबत आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील १७ वर्षांची मुलगी श्रुती बाबूराव नरे हीन आपल्या छोट्याशा आयुष्यानंतर ६ जणांना जीवनदान दिलं आहे. याबाबतीत सर्वात महत्त्वाचा ठरला आहे, तिच्या आईवडिलांचा निर्णय. श्रुती आज जगात नसली, तरीही देखील ती ६ जणांसाठी जगतेय, ६ जणांना ती जीवनदान देऊन गेली आहे, असंच म्हणता येईल.ORGAN DONATION PUNE: Shruti Nare from Pune … lived only 17 years; But she saved the lives of 6 people …
श्रुतीच्या आईवडिलांना श्रुतीचं जाण्याचं दु:ख हलकं करण्यासाठी ही बाब दिलासा देणारी ठरतीय. आपल्या मुलीने आणि पालक म्हणून योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे ६ जणांना जीवदान मोठं समाधान त्यांना आहे. यामुळे आपली श्रुती आजही जिवंत असल्याची त्यांची भावना आहे.
पिंपरी चिंचवड येथील दाम्पत्याने सर्वांना आदर्शवादी ठरावं अस काम केलं आहे. पोटच्या 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर या आई-वडिलाने मुलीचे अवयव दान केले आहेत. या दाम्पत्याची 17 वर्षाची मुलगी आज हयात नसली तरी तिच्या अवयवांमुळे आज तब्बल सहा जणांना जीवदान मिळाले आहे.
मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली अन् मृत्यू झाला
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील श्रुती नरे या 17 वर्षीय मुलीचा अचानकपणे मृत्यू झाला. चक्कर येत असल्यामुळे या मुलीचे सुरुवातीला डोके दुखायला लागले. तसेच नंतर ही मुलगी चक्कर येऊन बेशुद्ध पडली. ही घटना घडल्यानंतर मुलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, कोमात गेल्यामुळे तसेच मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे या मुलीचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
खरंतर श्रुती आणि तिच्या आईवडिलांवर जी वेळ आली ती कुणावरही येऊ नये. श्रुती ही हसतखेळत राहणारी मुलगी होती. यानंतर अचानक आलेल्या दु:खात बुडालेल्या तिच्या पालकांना विश्वासात घेण्याची हिंमत डॉक्टरांनी दाखवली. यानंतर श्रुतीच्या अवयवदानाचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला. यामुळे ६ जणांना जीवनदान मिळालं आहे.
अवयव दान करण्याचे डॉक्टरांचे आवाहन
श्रुतीच्या आई-वडिलांनी तिच्या अवयवांचे दान केल्यामुळे आज तब्बल सहा जणांचे प्राण वाचू शकले आहेत. असा प्रसंग कोणासोबतही येऊ नये. मात्र, हा दुर्दैवी प्रसंग घडलाच तर अवयवांचे दान करुन कोणाचातरी प्राण वाचू शकतो याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. सध्याच्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकाचे अवयव निकामी होत आहेत. किडनी, हृदय तसेच मुत्रपिंड निकामी होण्याची तर अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे या लोकांना वेळीच दुसरा अवयव भेटला तर त्यांचा जीव वाचू शकतो, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. श्रुती आज हयात नाही. पण तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे आजही ती जिवंत आहे.
श्रुती या वयात गेली, अचानक गेली हे तिच्या पालकांसाठी पचवणे खूप कठीण आहे, पण यात दिलासा म्हणून आपल्या इवल्याशा जीवाने ६ जणांना जीवदान दिलं ही बाब ही त्यांना दिलासा देणारी आहे.