वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोविडच्या संकटकाळात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारचे मनोधैर्य खचविण्याचा खूप प्रयत्न केला. मोदी व्हॅक्सिनसारखे शब्दप्रयोग वापरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण आता तेच विरोधक व्हॅक्सिनच्या शोधात आहेत, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मोदी विरोधकांवर निशाणा साधला. opposition had tried hard to break the morale of the govt as they said this is Modi’s vaccine
मोदी सरकारला दुसऱ्या टर्ममधील दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नड्डा यांनी भाजपच्या वतीने सरकाराच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. गेल्या वर्ष – सव्वावर्षापासून भारत मोदींच्या नेतृत्वाखाली कोविड महामारीचा मुकाबला करतोय. देशाची जनता धैर्याने या संकटाचा मुकाबला करते आहे. केंद्र सरकारची त्याला मजबूत साथ मिळतेय, असे सांगून नड्डा म्हणाले, की केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात विविध महत्त्वाचे निर्णय अत्यंत वेगाने घेतले. वैद्यकीय क्षेत्रात देशाने मोठी झेप घेतली.
वर्षभरापूर्वी अवघ्या २ कंपन्या कोविड प्रतिबंधक व्हॅक्सिन बनवत होत्या. आता १३ कंपन्यांना व्हॅक्सिन बनविण्याची परवानगी देण्यात आली आहे. लवकरच आणखी १९ कंपन्या व्हॅक्सिन उत्पादनात उतरतील. भारत बायोटेक कंपनी सध्या महिन्याला १.३० कोटी व्हॅक्सिन डोस बनवतीय. ऑक्टोबर २०२१ पर्यंत हीच कंपनी महिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन करेल. मोदी सरकारच्या वेगवान निर्णयप्रक्रियेमुळे हे शक्य झाले.
कोविडसारख्या संकटकाळात विरोधकांनी मोदी सरकारचे मनोधैर्य खचविण्याचा खूप प्रयत्न केला. मोदी व्हॅक्सिनसारखे शब्दप्रयोग वापरून बदनामी केली. पण आज तेच विरोधक व्हॅक्सिनच्या शोधात फिरत आहेत. सध्याची वेळ सेलिब्रेशनची नाही. म्हणून भाजपचे कार्यकर्ते सेवा ही संगठन हे ब्रीद मानून आज १ लाख गावांमध्ये कोविडशी संबंधित सेवा देत आहेत. विविध सुविधा पुरवत आहेत.
opposition had tried hard to break the morale of the govt as they said this is Modi’s vaccine
महत्त्वाच्या बातम्या
- राणीच्या बागेत आता गुंजणार चित्ता तसेच पांढऱ्या सिंहांची डरकाळी
- स्वच्छ भारत मिशन ! ‘ग्रँड वॉटर सेव्हिंग चॅलेंज’- केंद्र सरकार देत आहे ५ लाख रुपये जिंकण्याची संधी ; २५ जून पूर्वी करा अर्ज
- सोशल मीडियाच्या स्वयंघोषित फॅक्ट चेकर्सवर रविशंकर प्रसादांचा तिखट प्रहार; मोदी व्देषाच्या कारस्थानाची पोलखोल
- पवारांचे राजकारण ४० वर्षे ओळखत असल्याचे सांगत प्रकाश आंबेडकरांची खासदार संभाजीराजेंबरोबर जाण्याची तयारी