वृत्तसंस्था
सातारा : आनेवाडी टोल नाक्यावर थांबलेल्या २०० हून अधिक वाहनधारकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. महामार्गावर पाणी साचल्याने कोल्हापूर, कर्नाटकाकडे जाणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, निपाणी येथील पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मुंबई पुण्याकडून येणारी वाहने साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका खंडाळा, कराड येथे प्रशासनाकडून अडवण्यात आली आहेत.
आनेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांची संख्या २०० च्या आसपास असून मालवाहतूक तसेच खासगी वाहनचालकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. राज्य वाहतूक संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि भुईंज पोलिसांनी चालकांना फूड पॅकेट वाटप केले.
सातारा जिल्ह्यात महामार्गावर अडकून राहिलेल्या प्रवाश्यांना जिल्यातील संस्थांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
- पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी
- कर्नाटक, कोल्हापूरकडे वाहने आनेवाडी टोळवर
- वाहनचालकांना आनेवाडी टोलवर फूड पॅकेट वाटप
- राज्य वाहतूक संघ आणि भुईंज पोलिसांचा उपक्रम
- जिल्ह्यातील संस्थांना सढळ मदतीचे आवाहन
On Anewadi toll center food packets Distributed to 200 Driver
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांनी दिली दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट, ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित; ७६ मृत्यू, सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले
- अनोखी शस्त्रक्रिया : रुग्णाला भूल न देताच केले ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन, महिला रुग्ण शस्त्रक्रियेदरम्यान म्हणत राहिली हनुमान चालिसा! Watch Video
- Mirabai Chanu Profile : ऑलिम्पिक सिल्व्हर जिंकणाऱ्या मीराबाईची कहाणी, वेटलिफ्टिंगमध्ये वयाच्या 11व्या वर्षांपासून घेतेय मेहनत
- Tokyo Olympics : मीराबाई चानूने भारतासाठी जिंकले पहिले मेडल, वेटलिफ्टिंग मध्ये सिल्व्हरची कमाई