• Download App
    No one should think of running for office; Dhananjay Munde's reaction to Sambhaji Raje's statement

    सत्तेने प्रश्न सुटत नाहीत.. पदासाठी चळवळ कशाला करता? संभाजीराजेंना धनंजय मुंडे यांचा टोला!

    • मुख्यमंत्री पदावर क्रिया- प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    बीड : संभाजीराजे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपली इच्छा बोलून दाखवली होती. आता यावरच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून, सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही. चळवळ केली तर चळवळीतील प्रश्नांना यश मिळतं त्यासाठी मनात प्रामाणिकपणा असावा, पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये, असे देखील धनंजय मुंडे बोलले आहेत. No one should think of running for office; Dhananjay Munde’s reaction to Sambhaji Raje’s statement

    परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बाह्यवळण रस्त्याचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यादरम्यान त्यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार सक्षमपणे लढणार असल्याचं देखील सांगितले. तर विधानसभेचे अध्यक्ष पद काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे वायफळ चर्चेला अर्थ नसल्याचे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

    •  संभाजीराजे यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा
    •  सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही : मुंडे
    • चळवळ केली तर चळवळीतील प्रश्नांना यश
    •  पदासाठी चळवळ करणं कोणाच्या मनात येऊ नये
    • ओबीसी, मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध
    • विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार

    No one should think of running for office; Dhananjay Munde’s reaction to Sambhaji Raje’s statement

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??