• Download App
    लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल | The Focus India

    लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिली आहे का? निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्लाबोल

    भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का? अशी टीका राणे यांनी केली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय जनता पक्षावर टीका करणाऱ्या अजित पवारांवर भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का? अशी टीका राणे यांनी केली आहे. nilesh rane latest news

    नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे, असे अजित पवार म्हणाले होते.

    nilesh rane latest news

    त्यावर टीका करताना निलेश राणे म्हणाले की, वाह, अजित दादा वाह!! एका वर्षापुर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात? कुठेतरी अंत:करणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?

    पवारसाहेबांनी कान टोचले व कानपटीत पण दिली, निलेश राणे यांची शिवसेनेवर टीका

    गेल्या वर्षी अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडण्याचा प्रयत्न करत भारतीय जनता पक्षासोबत सरकार बनविले होते. याबाबत सगळ्याच पक्षांकडून चुप्पी साधली जाते. अजित पवारांना त्याबाबत कोणी विचारणा करत नाही. मात्र, आता त्यांनीच भाजपावर टीका केल्यामुळे राणे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!

    Operation Sindoor मधून भारताचा नूर खान + किराणा हिल्स मधल्या अण्वस्त्रांना धक्का, पाकिस्तानात रेडिएशनचा धोका, अमेरिकेसकट चीनला हादरा!!