• Download App
    अजित पवारांचे राजकारण शरद पवारांच्या जीवावर, स्वत: ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही, निलेश राणे यांची टीका | The Focus India

    अजित पवारांचे राजकारण शरद पवारांच्या जीवावर, स्वत: ग्रामपंचायत सदस्यही निवडून आणू शकत नाही, निलेश राणे यांची टीका

    अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना जे काही मिळालं आहे ते शरद पवारांमुळेच त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अजित पवार यांचे संपूर्ण राजकारण शरद पवारांच्या जीवावर चालू आहे. ते स्वत:च्या कर्तुत्वावर एक ग्रामपंचायतीचा सदस्यदेखील निवडणून आणू शकत नाही याची आम्हाला खात्री आहे.आज त्यांना जे काही मिळालं आहे ते शरद पवारांमुळेच त्यावर त्यांनी स्वत:चं लेबल लावू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. Nilesh Rane criticizes Ajit Pawar

    दुसऱ्य्या पक्षात गेलेल्यांनी परत यावं महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देऊन त्यांना आपण निवडून आणू असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी टीका केली.

    ते म्हणाले की, एका वषार्नंतर मागे जे काही झालं त्यावरून लोकं मागचं विसरले असं अजित पवार यांना वाटत असावं. आज आमदारांना येण्यास जे ते सांगतायत त्यांना वर्षभरापूर्वी स्वत:चे आमदार टिकवता आले नाहीत. अजित पवार हे आता बोलायला लागलेत. अजित पवारांचा इतिहास पाहिला तर त्यात लोकोपयोगी कामं दिसणार नाहीत. घोटाळे, त्यांची घाणेरडी वक्तव्य यामुळेच ते चर्चेत असतात. लोकोपयोगी कामांसाठी अजित पवार हे चर्चेत नसतात.

    राणे म्हणाले की, तुम्ही आमच्याकडे या आम्ही निवडून देऊ, तुमच्याकडे तुम्हाला आमदार राखता आले नाहीत. त्यामुळे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन ते सरकार सोडावं लागलं. ज्यांच्याकडे एकही आमदार राहायला तयार नव्हता ते अजित पवार आम्हाला आठवतात. अजित पवारांची स्वत:ची ताकद नाही. बारामतीत जी ताकद आहे ती शरद पवार यांनी स्वत: निर्माण केलेली आणि टिकवलेली आहे. अजूनही शरद पवार यांचं लहानसहान गोष्टींवरही लक्ष असतं. अजित पवार यांनी ते काही केलं नाही त्यामुळे ते काही श्रेय घेऊ शकत नाही.

    Nilesh Rane criticizes Ajit Pawar

    अजित पवारांचा स्वत:चा आमदार आहे असं चित्र महाराष्ट्रात तरी नाही त्यामुळे त्यांनी मोठ्या गोष्टी करू नये, अजित पवार आज म्हणतात मला ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी काय केलं या ३० वर्षांत असा सवाल करून राणे म्हणाले की, शरद पवार यांना बाजूला करून अजित पवार यांनी केलेली एक वास्तू तरी दाखवा. त्यांना जे काही मिळालंय ते शरद पवार यांच्यामुळे. नुसतं भाजपावर टीका करून तुमचं काम सोप होणार नाही. तुम्हाला काम करून दाखवावं लागेल.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!