• Download App
    ...तरीही मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही, निलेश राणे यांची अजित पवारांवर टीका | The Focus India

    …तरीही मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही, निलेश राणे यांची अजित पवारांवर टीका

    कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं. पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
    Nilesh Rane criticizes Ajit Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ वर्षे उपमुख्यमंत्रीपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं. पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
    Nilesh Rane criticizes Ajit Pawar

    देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेऊन राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला होता. परंतु, हा प्रयत्न फसल्यावर साळसुदपणे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. सरकार टिकविण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस यांच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांच्याबाबत शंका असूनही सरकार टिकविण्यासाठी तोंड दाबून बुक्यांचा मार खावा लागत आहे. मात्र, निलेश राणे यांनी प्रथमच अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवरून सवाल केला आहे.

    याचे कारण म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हज को चली, अशी अजित पवार यांची अवस्था आहे. भाजपच्या गळ्यात गळा घालणारे अजित पवार आता भाजपवर टीका करू लागत आहे. अजित पवार म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यांत पडेल, सहा महिन्यांत पडेल अशी विधाने करत होते.

    ठाकरे – पवारांच्या राज्यात बसवरचा भगवा काढून मराठा मोर्चावर पोलिसी कारवाई

    मात्र, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून, वर्षानंतरही महाविकास आघाडी सरकार हे भक्कमपणे चालत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आघाडीतील तीन पक्षातून तुमच्या पक्षात गेलेले आमदार आता पुन्हा परत येणार असून, त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे अजित पवार म्हणाले. यावरूनच निलेश राणे यांनी टीका केली.

    Nilesh Rane criticizes Ajit Pawar

    अजित पवार यांनी एक वर्षांपूर्वी कशा पध्दतीने भाजपाच्या गळ्यात गळा घालत महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वीच त्याला नख लावण्याच प्रयत्न केला होता, याची आठवण करून दिली आहे.

    Related posts

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…

    राहुल गांधी म्हणतात, भारताची अर्थव्यवस्था resilient, production based बनवायला हवी, पण “तशी” अर्थव्यवस्था बनवायला कुणी अडवले होते??