• Download App
    तामीळनाडूत 'गांधी-नेहरुं'ना ऑर्डर सोडणार एम.के स्टालिन 'Nehru' & 'Gandhi' going to report to MK Stalin now in Tamil Nadu

    तामीळनाडूत ‘गांधी-नेहरुं’ना ऑर्डर सोडणार एम.के स्टालिन

    तामिळनाडू राज्यात सत्तेत आलेल्या द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)चे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात ‘गांधी-नेहरुं’ना स्थान दिले आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ‘गांधी-नेहरुं’ना स्टालिन यांनी बोटावर नाचवले तर आश्चर्य वाटायला नको, अशी चर्चा तामिळनाडूतल्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ‘Nehru’ & ‘Gandhi’ going to report to MK Stalin now in Tamil Nadu


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याप्रमाणेच आडनाव असणारे दोन आमदार तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात असणार आहेत. त्यामुळे येथून पुढे डीएमकेचे सर्वेसर्वा एम. के. स्टालिन यांच्या तालावर तामिळनाडूतले ‘गांधी-नेहरु’ नाचताना दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.



    स्टालिन यांनी हा योग मुद्दाम जुळवून आणल्याचे त्यांचे राजकीय विरोधक सांगतात. स्टालिन यांनी खादी व ग्रामीण रोजगार विभागाची जबाबदारी आर. गांधी यांच्यावर तर शहरी विकास विभाग के. नेहरू यांच्याकडे सोपवला आहे. देशाच्या इतिहासात अत्युच्च स्थान असणाऱ्या महात्मा गांधी आणि पंडित नेहरु या नेत्यांबद्दल डीएमकेने यापूर्वी कधीच आदरभाव दाखवलेला नाही. उलट उत्तरेकडील या उत्तुंग नेत्यांबद्दल एकप्रकारचा आकस या पक्षाने दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळात गांधी आणि नेहरु या आडनावाच्या आमदारांना स्टालिन यांनी स्थान दिले आहे.

    मंत्रीमंडळाच्या बैठकीत आता स्टालिन या गांधी-नेहरुंना आता बोलू नका, तुमची वेळ संपली आहे, तुम्ही उत्तर द्या, येथून चालते व्हा यासारखे आदेश देऊ शकतात. विशेष म्हणजे स्टालिन यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळात सहभागी करुन घेतलेल्या आर. गांधी आणि के. नेहरु या दोन्ही आमदारांवर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. राणीपेट मतदारसंघातून चार वेळा आमदार असलेले आर. गांधी यांच्याकडे खादी, ग्रामीण उद्योग आणि भूधन खाती देण्यात आली आहेत.

    तर त्रिची-पश्चिम येथून पाचव्यांदा आमदार झालेल्या के. नेहरु यांच्याकडे नगरविकास आणि नगरपालिका प्रशासन विभागाचे मंत्रीपद सुपूर्त करण्यात आले आहे. सन 2005 मध्ये आर. गांधी आणि त्यांच्या पत्नी यांच्या विरोधात उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याबद्दल भ्रष्टाचाराचा खटला चालवण्यात आला होता.

    ‘Nehru’ & ‘Gandhi’ going to report to MK Stalin now in Tamil Nadu

    महत्वाच्या  बातम्या 

    Related posts

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव

    मोदी सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा, तब्बल 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस दिली परवानगी