• Download App
    महिलासुरक्षेच्या बाता मारणाऱ्या ठाकरे – पवारांच्या राज्यात; बलात्काराचा गुन्हा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला अद्याप अटक नाही | The Focus India

    महिलासुरक्षेच्या बाता मारणाऱ्या ठाकरे – पवारांच्या राज्यात; बलात्काराचा गुन्हा असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला अद्याप अटक नाही

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शक्ती कायद्याचा नुसताच गाजावाजा करणाऱ्या ठाकरे – पवार महाविकास आघाडी सरकारवर सगळीकडून टीकेचे बाण सुटत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेखवर बलात्कारचा गुन्हा दाखल होतो, पण त्याला पोलिस अद्याप अटक करत नाहीत, यावरून महाराष्ट्रात संताप व्यक्त होतोय. भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याच संतापाला पुढे येऊन वाचा फोडली आहे. या दोन्ही नेत्यांनी ठाकरे – पवार सरकारच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले आहेत. NCP state president has not yet been arrested for rape

    महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विधेयकानुसार शिक्षेचे प्रमाण वाढविले असून नवीन गुन्हे देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. ठाकरे – पवार सरकारने या कायद्यांचा मोठा गाजावाजा केला.

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत मेहबूब शेख (संग्रहित छायाचित्र)

    मात्र, हे कायदे किती अमलात येऊन पीडितांना न्याय मिळवून देणार यावर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. आता ठाकरे – पवारांच्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्याविरोधात विनयभंगाचा व बळजबरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण त्याला अद्याप अटकच करण्यात आलेली नाही. औरंगाबाद शहरातील बायजीपुरा येथे राहणाऱ्या खाजगी शिकवणी घेणाऱ्या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    याच संदर्भात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. महिला सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकअध्यक्षवर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल. चौकशी व तपासाच्या नावाखाली अद्याप पोलिसांनी अटक देखील केलेली नाही.

    NCP state president has not yet been arrested for rape

    आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्षकार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का? याचे. उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्यावे. पीडितेच्या कुटुंबावर दबाव आणला जात आहे. कायद्यानुसार पीडिता वा कुटुंबावर दबाव येऊ नये म्हणून आरोपीला अटक करण्याचा नियम आहे, मात्र तो इथे डावलण्यात आल्याचा आरोप देखील चित्र वाघ यांनी केला आहे.

    ठाकरे – पवारांच्या “शक्ती”ची लिटमस टेस्ट

    “एकीकडे पवार-ठाकरे सरकार महिला अत्याचार रोखण्यास ‘शक्ती’ विधेयक आणते आणि दुसरीकडे राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्षावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल होऊनही अटक नाही. किंबहुना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र विनातपास दिले जात आहे. तपास नाही, खटला चालविलेला नाही, न्यायालयाने निकालही दिलेला नाही; मग निर्दोषत्व देण्याची घाई कशाला? खरे तर ही घटना ‘शक्ती’ची ही लिटमस टेस्ट आहे. महिला अत्याचार रोखण्याची राज्य सरकारची खरोखरच तळमळ आणि इच्छाशक्ती असेल तर कारवाईची सुरुवात या घटनेपासून केली पाहिजे.”
    : विजया रहाटकर

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…