• Download App
    राष्ट्रवादीच्या नेत्याकडून हिंदूंना शिव्या, देशातून बाहेर हाकलून देण्याची धमकी | The Focus India

    राष्ट्रवादीच्या नेत्याकडून हिंदूंना शिव्या, देशातून बाहेर हाकलून देण्याची धमकी

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहर अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षाने हिंदूंना अश्लिल शब्दांत शिवीगाळ करत देशाबाहेर हाकलून देण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नागपूर शहर अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षाने हिंदूंना अश्लिल शब्दांत शिवीगाळ करत देशाबाहेर हाकलून देण्याची धमकी दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    NCP leader threatens Hindus to leave India

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नागपूर शहर अल्पसंख्यांक विभागाचा अध्यक्ष अरबाज खान याचा हा व्हिडीओ आहे. सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज खान याने हिंदूंना अत्यंत अश्लिल शब्दांत शिव्या दिल्या आहेत. त्याचबरोबर हिंदू महिलांबाबत अभद्र भाषेचा वापर केला आहे. हिंदूंना भारतातून हाकलून देण्याची धमकीही त्याने दिली आहे. अत्यंत अश्लिल भाषेत आपल्या घराचा पत्ता देत माझे काही बिघडवू शकत असाल तर या, अशी धमकीही त्याने दिली आहे.

    NCP leader threatens Hindus to leave India

    अरबाज खान याने हा व्हिडीओ आपलाच आहे मात्र आत्ताचा नाही, असे म्हटले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अरबाज खान याने माफीही मागितली आहे. हिंदूंनी मला कृपया माफ करावे. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आत्ताची माझी चूक माफ करावी, असे त्याने म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अरबाज खान याच्या अपमानजनक आणि अश्लिल वक्तव्याबाबत काहीही कारवाई केलेली नाही, यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. केवळ उध्दव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉटसअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्याने एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेने या व्हिडीओबाबत मात्र चुप्पी साधली आहे. सत्ता टिकविण्यासाठी शिवसेना हिंदूंना शिव्या देणाऱ्यांसोबतही राहणार का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!