• Download App
    पवारांच्या बैठकीला जावेद अख्तर, करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, आशूतोष आदींना निमंत्रण; ल्यूटन्स दिल्लीच्या वर्तुळात नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न NCP leader Nawab Malik says several prominent political leaders & eminent persons including Farooq Abdullah

    पवारांच्या बैठकीला जावेद अख्तर, करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, आशूतोष आदींना निमंत्रण; ल्यूटन्स दिल्लीच्या वर्तुळात नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न

    विनायक ढेरे

    नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. या आघाडीला राजकीय पक्ष वगळून बॉलिवूडचे लिबरल्स आणि ल्यूटन्स दिल्लीतले पत्रकार देखील हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. NCP leader Nawab Malik says several prominent political leaders & eminent persons including Farooq Abdullah

    राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नबाब मलिक यांनी केलेल्या ट्विटनुसार पवारांनी बोलावलेल्या नेत्यांच्या यादीत कोणत्याही राजकीय पक्षाशी अधिकृत संबंध नसलेल्या परंतु, प्रत्येक राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नावर मोदीविरोधात मते नोंदविणाऱ्या एलिट क्लासच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

    पवारांच्या बैठकीला बॉलिवूडचे पटकथाकार जावेद अख्तर, ल्यूटन्स दिल्लीतला पत्रकार करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, टीव्हीचा माजी पत्रकार आशूतोष यांच्या बरोबरच माजी मुख्य निवडणूक आयुक्त शाहबुद्दीन याकूब कुरेशी, कॉलिन घोल्सान्विस, सध्या फारसा चर्चेत नसलेले पत्रकार प्रीतीश नंदी, रॉबर्ट वड्रांचे जमीन गैरव्यवहार प्रकरणात वकील राहिलेले के. टी. एस. तुलसी, माजीद मेमन, न्यायमूर्ती अरूण सिंग आदी तथाकथित अराजकीय व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे.

    काँग्रेसला वगळून आपल्या तिसऱ्या राष्ट्रमंचाला बौध्दिक आधार आणि ल्यूटन्स दिल्लीमध्ये स्थान मिळवून देण्याचा हा पवारांचा प्रयत्न मानला जातो आहे. पवारांची महाराष्ट्रातल्या राजकारणातली प्रतिमा मराठी माध्यमांनी कितीही लार्जर दॅन लाइफ केली असली, तरी दिल्लीत त्यांची प्रतिमा मराठा स्ट्राँग मॅन एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. दिल्लीच्या सत्ताकारणाच्या अंर्तवर्तुळात पवारांना काही स्थान असल्याचे दिल्लीत कोणी मानतही नाही.

    परंतु, उद्याच्या बैठकीत करण थापर, आशूतोष आणि प्रीतीश नंदी या ल्यूटन्स दिल्लीतल्या पत्रकारांना आमंत्रित करून पवारांनी आपली स्थापना दिल्लीच्या तख्तावर करण्यापूर्वी निदान ल्यूटन्स दिल्लीच्या पत्रकारांमध्ये स्थान मिळण्याची तरतूद केल्याचे मानले जात आहे.

    या खेरीज पवारांचे मित्र डॉ. फारूख अब्दुल्ला, डी. राजा, य़शवंत सिन्हा, पवन वर्मा, काँग्रेसमधून बाहेर काढलेले संजय सिंग यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

    NCP leader Nawab Malik says several prominent political leaders & eminent persons including Farooq Abdullah

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Operation sindoor मध्ये भारतीय सैन्य दलांनी 100 + दहशतवादी, पाकिस्तानचे 35 ते 40 अधिकारी आणि सैनिक मारले!!