• Download App
    सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, मलिकांचा पुन्हा वारNCP Leader Nawab Malik lashesh Out at BJP Leader Kirit Somaiya Says I Will expose BJP in Assembly Winter Session

    Nawab Malik V/s Kirit Somaiya : सोमय्यांची धमकी पोकळ, मीच अधिवेशनात पोलखोल करणार, मलिकांचा पुन्हा वार

     

    राज्यात लवकरच हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळ पाहता हेही अधिवेशन हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर नेत्यांवर केलेल्या विविध आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील, असा मलिक यांनी केला आहे.NCP Leader Nawab Malik lashesh Out at BJP Leader Kirit Somaiya Says I Will expose BJP in Assembly Winter Session


    प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात लवकरच हिवाळी अधिवेशन नियोजित आहे. मागच्या पावसाळी अधिवेशनातील गदारोळ पाहता हेही अधिवेशन हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मातब्बर नेत्यांवर केलेल्या विविध आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. किरीट सोमय्या हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील, असा मलिक यांनी केला आहे.

    माध्यमांशी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भंडाफोड करणार की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच पिक्चर सुरू आहे. इंटरव्हल झाला आहे, असंही ते म्हणाले.

    मलिक पुढे म्हणाले की, तुमच्याकडे एवढा मोठा पसारा आहे. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय आहे. सर्व काही आहे. तुम्ही सात वर्षे नवाब मलिकांबाबत खोदत आहात. अजून खोदा. पण मी काही केलंच नाही. तुम्ही करणार काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव असल्याचंही ते म्हणाले.

    समीर वानखेडे मुस्लिमच

    मलिक म्हणाले की, मी काल ट्विट केलेला फोटो हा जस्मीन वानखेडे यांच्या पतीचा आहे. समीर वानखेडेचा हा मेव्हणा आहे. सध्या युरोपमधील व्हेनिसमध्ये तो राहतो. जस्मीन वानखेडे यांच्यासोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्मानेच मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे, असा दावाही त्यांनी केला. वानखेडे कुटुंबाने 2015 पासून आपली ओळख लपवली. फेसबुकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जस्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

    NCP Leader Nawab Malik lashesh Out at BJP Leader Kirit Somaiya Says I Will expose BJP in Assembly Winter Session

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…