विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचे रेटिंग त्यांच्या गेल्यावेळच्या रेटिंगपेक्षा घटल्याची मल्लिनाथी काही विशिष्ट माध्यमांनी केली असली, तरी त्यांच्या लोकप्रियतेचा आलेख जागतिक नेत्यांपेक्षा वरचढच असल्याचे स्पष्ट झाले आहे. narendramodi ji’s Global approval rating at 66%, ahead of US President Biden, Germany’s Merkel & other top world leaders
कोविडच्या प्रचंड प्रतिकूल काळात भारत सर्व बाजूंनी लढतोय. त्याचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अग्रस्थानी राहून करत आहेत. त्याचे प्रतिबिंब मोदींच्या सध्याच्या रेटिंगमध्ये पडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे अध्यक्ष इम्यूएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान सुगा यांचे रेटिंग पंतप्रधान मोदींपेक्षा कितीतरी कमी आहे. मॉर्निंग कन्स्लटंट या आंतरराष्ट्रीय संस्थेने ग्लोबल लीडर्स अप्रुव्हल अर्थात नेत्यांच्या जनतेतल्या अधिमान्यतेचे रेटिंग काढले आहे.
यामध्ये पंतप्रधान मोदी सगळ्यात लोकप्रिय ठरले असून त्यांचे रेटिंग ६६ % आहे. ज्यो बायडेन यांचे रेटिंग ५३ %, बोरिस जॉन्सन यांचे रेटिंग ४४ %, इम्यूएल मॅक्रॉन यांचे रेटिंग ३५ %, तर जपानचे पंतप्रधान सुगा यांचे रेटिंग २९ % आहे. बाकीच्या नेत्यांची रेटिंग देखील मोदींच्या खालीच आहे.
मात्र, भारतातील काही माध्यमांनी या रेटिंगच्या बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याच्या स्वरूपात दिल्या आहेत. त्यांचे काही महिन्यांपूर्वीचे रेटिंग ८२ % होते, ते आता ६६ % वर आल्याची या माध्यमांची मल्लिनाथी आहे. पण यातला कोविडचा प्रतिकूल काळ आणि त्यामध्ये भारताच्या लढ्यात मोदींचे नेतृत्व ही परिस्थिती ही माध्यमे विसरली आहेत. ते फक्त मोदींची लोकप्रियता घसरल्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याच्या मागे लागले आहेत.