देशवासियांनाही केले आवाहन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नव्या कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले असून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी पत्र लिहिले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह, पियूष गोयल, निर्मला सीतारमन, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र तोमर यांनी हे पत्र प्रसिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र तोमर यांचे हे पत्र ट्विट करून शेतकऱ्यांना ते वाचण्याचे आवाहन केले आहे.
narendra Modi appealed agitating farmers to read letter
narendra Modi appealed agitating farmers to read letter
“कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिनींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे,” असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.