• Download App
    Mumbai Indians vs Sunrisers IPL 2021 : सनरायजर्स हैदराबाद मुंबई इंडियन्स आमनेसामने ; विक्रम करण्याची संधी ! mumbai indians vs sunrisers hyderabad

    Mumbai Indians vs Sunrisers IPL 2021 : सनरायजर्स हैदराबाद मुंबई इंडियन्स आमनेसामने ; विक्रम करण्याची संधी

    • मुंबईचा संघ कमी धावसंख्या झाल्या तरी सामना खेचून आणण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे या सामन्यात मुंबईच पारडं जड मानलं जात आहे.
    • या दोन्ही संघांनी या मोसमात 2 प्रत्येकी 2 सामने जिंकले आहे. मुंबईने 1 मॅच जिंकली आहे. तर हैदराबादला या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई: डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबाद आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये थोड्या वेळातच आयपीएलची नववी मॅच होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्‍टेडियमवर ही मॅच होईल. mumbai indians vs sunrisers hyderabad

    हैदराबादला या हंगामात एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे हा सामना जिंकून पहिला विजय सकारण्याचा हैदराबादचा प्रयत्न असेल.

    मागील सामन्यात मुंबईने कोलकाता विरुद्ध मोक्याच्या क्षणी सामना फिरवून विजय मिळवला होता. मुंबईचा संघ सर्व संघांपैकी सर्वात तगडा संघ मानला जात आहे. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव तसेच संघातील इतर खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. तर मुंबईकडे बोल्ट आणि बुमराह हे जागतिक दर्जाचे 2 महत्वाचे गोलंदाज आहेत.

    साधारण हैदराबाद विरुद्ध मुंबई आतापर्यंत IPLमध्ये झालेल्या सामन्यांचा विचार करायाचा झाला तर दोन्ही संघ 16 सामने एकमेकांविरोधात खेळले आहेत. त्यापैकी दोन्ही संघ 8-8 वेळा जिंकले आहेत.

    या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक क्रिकेटपटूंना  विक्रम करण्याची संधी आहे.

     

    सनरायझर्स हैदराबाद संघ
    ऋद्धिमान साहा, डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, जॉनी बेअरस्टो / केन विल्यमसन, अब्दुल समद, केदार जाधव / विजय शंकर, जेसन होल्डर, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, शाहबाज नदीम, आणि टी नटराजन

    मुंबई इंडियन्स संघ
    क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, मार्को जेन्सन / नाथन कुलपर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बाउल्ट आणि जसप्रीत बुमराह

    mumbai indians vs sunrisers hyderabad

     

     

     

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार