• Download App
    मुंबई बॉम्बस्फोट, इशरत जहाँ, 370 कलम ते काश्मीर फाईल्स; शरद पवार फडणवीसांच्या टार्गेटवर!!Mumbai bomb blast, Ishrat Jahan, Article 370 to Kashmir files

    Pawar – Fadanavis : मुंबई बॉम्बस्फोट, इशरत जहाँ, 370 कलम ते काश्मीर फाईल्स; शरद पवार फडणवीसांच्या टार्गेटवर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या विशेषतः शरद पवारांच्या जातीवादी राजकारणावर तसेच मुस्लिम लांगूलचालनावर सध्या तोफा डागल्या असताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेट वर देखील शरद पवार आले आहेत, ते देखील मुस्लिम धार्जिण्या धोरणावर…!!Mumbai bomb blast, Ishrat Jahan, Article 370 to Kashmir files

    देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ एक अशी 14 ट्विट करून शरद पवार यांच्या मुस्लीम धार्जिण्या धोरणाला टार्गेट केले आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोट, इशरत जहाँ प्रकरण ते सध्या गाजत असलेला सिनेमा “द काश्मीर फाईल्स” या मुद्द्यांवर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर फडणवीसांनी जोरदार शरसंधान साधले आहे.

    मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळी प्रत्यक्ष 12 ठिकाणी बाँबस्फोट झाले असताना शरद पवारांनी 13 वा बाँबस्फोट मुस्लीम वस्तीत झाला, असे खोटे विधान केले होते. त्याचे नंतर त्यांनी समर्थन देखील केले होते. हिंदू – मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी ते आवश्यक असल्याचा त्यांचा दावा होता. मात्र या विधानातून त्यांचे मुस्लिम लांगूलचालनच दिसते, असे टीकास्त्र फडणवीस यांनी ट्विट मधून सोडले आहे.

    या खेरीज शरद पवारांनी “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग वारंवार वापरला इतकेच नाही, तर नवाब मलिक यांना दाऊद आणि त्याची बहीण हसीना पारकर हिच्या कनेक्शन मुळे अटक झाली. त्यावेळी देखील नवाब मलिक मुस्लिम असल्यामुळे त्यांना अटक केल्याचा कांगावा शरद पवारांनी केला होता, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे. दहशतवादी इशरत जहाँ हिचे समर्थन शरद पवारांनी केले होते. हीच ती इशरत जहाँ आहे, जी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते मुख्यमंत्री असताना ठार मारण्याच्या कटात सामील झाली होती. हिजबुल मुजाहिदीन पासून आयएसआय पर्यंत सर्व संघटनांशी तिचे संबंध होते. तरी देखील शरद पवारांनी शरद ती निर्दोष असल्याचा स्वयंघोषित निर्वाळा दिला होता, याकडे फडणवीस यांनी आपल्या ट्विटमधून लक्ष वेधले आहे.

    सच्चर आयोगाची अंमलबजावणी, हिजाबचे समर्थन अशा अनेक मुद्द्यांवर पवारांनी नेहमी मुस्लीम लांगूलचालनाची भूमिका घेतली होती, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

    जम्मू काश्मीरमधील 370 कलम लागू करण्यास घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध होता. त्याच भूमिकेला अनुसरून केंद्रातल्या सरकारने 370 कलम हटविले. मात्र, त्यावेळी शरद पवारांनी 370 कलमाचे समर्थन केले होते याची आठवण देखील फडणवीस यांनी पवारांना करून दिली आहे. एरवी शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकरांची नावे घेतात. परंतु, आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भारताविषयी ते कायम दुटप्पी भूमिका घेतात, असे शरसंधान फडणवीस यांनी साधले आहे.

    “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा 1990 च्या दशकातील हिंदू नरसंहाराचे वास्तव दाखवतो. मात्र पवारांनी या सिनेमाचा विपर्यस्त अर्थ लावत हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणारा सिनेमा असे लेबल लावले आहे, असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले आहे.

    आपल्या सर्व ट्विट मधून फडणवीस यांनी पवारांच्या त्या त्या वेळेच्या भूमिका आणि बातम्या आवर्जून ट्विटच्या लिंक मधून जोडल्या आहेत. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या जातीवादी राजकारणावर शरसंधान केले होते, तर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या मुस्लिमधार्जिण्या धोरणावर शरसंधान केले आहे.

    Mumbai bomb blast, Ishrat Jahan, Article 370 to Kashmir files

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    Operation sindoor : भारताने पाकिस्तानच्या किराणा हिल्स वरील अण्वस्त्रांना धक्का लावला का??, भारतीय हवाई दलाच्या DGMO चे “कानावर हात”!!