• Download App
    Mhada paper leaked : opened the eyes of the state government; Important decision taken! Now all the exams will be taken by MKCL - IBPS - TCS

    पेपरफुटीनंतर राज्य सरकारचे डोळे उघडले ; घेतला महत्त्वाचा निर्णय ! आता सर्व परीक्षा MKCL – IBPS – TCS घेणार

    राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे


    म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे.


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.. यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला .म्हाडाच्या परीक्षेत झालेल्या पेपरफुटीनंतर राज्य सराकारला अखेर जाग आली आहे. राज्य सरकारच्या सर्व परीक्षा आता MKCL, IBPS, आणि TCS घेणार आहे.Mhada paper leaked : opened the eyes of the state government; Important decision taken! Now all the exams will be taken by MKCL – IBPS – TCS

    म्हाडाच्या पेपरफुटीनंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

    अलिकडेच झालेल्या पेपरफुटीमुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला होता. या पेपरफुटीनंतर राज्य सरकारला म्हाडाच्या परीक्षा रद्द करव्या लागल्या होत्या .

    या पेपरफुटीची सध्या चौकशी सुरू आहे. यात आणखी काही महत्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. यात पोलिसांनी काही संभाषणेही तपासली आहेत.

     

    याआधीही पेपरफुटी

    याआधीही अनेक पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अनेक विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटले होते.

    त्यानंतर आरोग्य विभागाचे पेपर फुटल्याने कित्येक वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत.

    त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड नुकसानाला आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने आज अखेर राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर इथून पुढे सर्व परीक्षा MKCL, IBPS, आणि TCS घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

     

    Mhada paper leaked : opened the eyes of the state government; Important decision taken! Now all the exams will be taken by MKCL – IBPS – TCS

     

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!