• Download App
    हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची लवकर घरवापसी करा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची यांची हिंदू एकता महाकुंभात प्रतिज्ञा Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat's pledge of Hindu unity in Mahakumbh

    हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची लवकर घरवापसी करा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची यांची हिंदू एकता महाकुंभात प्रतिज्ञा

    प्रतिनिधी

    चित्रकुट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अत्यंत महत्त्वाची घोषणा करत हिंदू धर्म सोडून गेलेल्या व्यक्तींची लवकरात लवकर घरवापसी करा, अशी प्रतिज्ञा हिंदू एकता महाकुंभात सहभागी झालेल्या सर्व धर्म प्रेमींना दिली आहे.Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat’s pledge of Hindu unity in Mahakumbh

    भगवान श्रीरामांची संकल्प भूमी असलेल्या चित्रकूट मध्ये हिंदू एकता महाकुंभ सुरू आहे. या महाकुंभात प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक डॉ. भागवत बोलत होते. ते म्हणाले, की ज्यांना धमक्या देऊन, घाबरवून हिंदू धर्मातून परक्या धर्मामध्ये लोक घेऊन गेले आहेत. त्यांची लवकरात लवकर आपण आपल्या धर्मात घरवापसी केला पाहिजे. आपल्या परिवारात त्यांना स्थान दिले पाहिजे. त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे. आपला अहंकार टाकून आपले ऐक्य टिकवले पाहिजे. आपण ही प्रतिज्ञा केली पाहिजे की, मी कोणालाही हिंदू धर्मापासून अलग होऊ देणार नाही. त्याच्याशी सौजन्याने आणि प्रेमाने वागून त्याला आपलेसे करेन. हिंदू माता भगिनींचे शील रक्षण करेन. ही प्रतिज्ञा हिंदू एकता महाकुंभात जमलेल्या लाखो हिंदू बांधवांना डॉ. मोहन भागवत यांनी दिली आहे.



    हिंदू एकता महाकुंभात 12 मुद्दे मांडले आहेत. त्या सर्वांचे समर्थन अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले आहे. यामध्ये समान नागरी कायदा, लव्ह जिहाद विरोधातील कायदा, स्त्री-पुरुषांना समान शिक्षण, स्त्री-पुरुष भेद रहित समाजव्यवस्था तसेच धर्मांतर विरोधी कायदा या मुद्द्यांचा समावेश आहे.

    या पार्श्वभूमीवर आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू बांधवांना दिलेल्या प्रतिज्ञेचे महत्त्व अधिक आहे. हिंदू धर्मातून दूर लोटल्या गेलेल्या तसेच धाकधपटशाने परधर्मामध्ये गेलेल्या आपल्या बांधवांना परत आपल्या हिंदू धर्मात स्थान देणे याचे महत्त्व डॉ. भागवत यांनी अधोरेखित केले आहे.

    Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat’s pledge of Hindu unity in Mahakumbh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!