विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्रातले कन्नड, जगदंबा, दौंड, पुष्पदंतेश्वर, जरंडेश्वर हे कारखाने शरद पवारांनी बेकायदेशीरित्या बळकावले आहेत. त्यांचे पुरावे आम्ही कोर्टासमोर सादर केलेत. शरद पवारांनी पुढे येऊन सांगावे की या कारखान्यांशी आणि बारामती ऍग्रोशी आपला संबंध नाही, असे आव्हान माजी आमदार आणि शिखर बँक घोटाळा प्रकरणातले याचिकाकर्ते माणिकराव जाधव यांनी दिले आहे. Manikrao jadhav open challenge to sharad pawar for debate on suger factories scam
बारामती ऍग्रो कंपनी ही पवार कुटुंबीयांची खासगी कंपनी आहे. पवार कुटुंबीय त्याचे शेअर होल्डर आहेत. त्यांनी त्याचे हेडक्वार्टर सिंगापूरला ठेवले आहे. त्यांनी १० वर्षापूर्वी कन्नड सहकारी साखर कारखाना कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता शरद पवारांनी बळकावला. आता त्यांना वाटत असेल, तर त्यांनी पुढे येऊन सांगावे, की आपला बारामती ऍग्रोशी संबंध नाही म्हणून. आमच्याकडे पुरावे आहेत. ते कोर्टासमोर ठेवले आहेत, असे माणिकराव जाधव यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
शिखर बँकेचे भागभांडवल २५ हजार कोटींचे होते. तरीही ती बँक बुडाली कारण पवारांच्या बगलबच्च्यांनी तिचे कर्ज खाल्ले. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने कवडीमोल भावाने खासगी करून टाकले. ईडीने आता कारवाई सुरू केली आहे. ती अशीच सुरू ठेवावी. मी, अण्णा हजारे, शालिनीताई पाटील यांनी मिळून याचिका दाखल केली आहे. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागे करण्याचे मोहीम आम्ही सुरू करणार आहोत, असे माणिकराव जाधव म्हणाले.
ईडीचे अभिनंदन केले पाहिजे. कारण त्यांनी आर्थिक घोटाळ्याचा तपास करून मालमत्ता ताब्यात घेतली. आता ५५ कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घ्यावी. त्यांचीची सखोल चौकशी ईडीने करावी. कारण महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने शरद पवारांना त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून क्लिन चिट दिली आहे. पण ईडीने जारीने तपास सुरू ठेवला आहे. तो तसाच सुरू ठेवून असेच घोटाळे करून विकलेले ५५ कारखाने ताब्यात घ्यावेत. शिखर बँकेच्या ताब्यातले ४५ कारखाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी माणिकराव जाधव यांनी केली आहे.
Manikrao jadhav open challenge to sharad pawar for debate on suger factories scam
महत्त्वाच्या बातम्या
- बॉलीवूडकडे ईडीचा मोर्चा, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अभिनेत्री यामी गौतमला समन्स, नुकतेच झाले होते लग्न
- ऑस्कर कमिटीच्या सदस्यपदी विद्या बालन आणि एकता कपूरची वर्णी, अकॅडमीसाठी निवडलेल्या चित्रपटांना मतदानाचा मिळाला अधिकार
- योगी सरकारने कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राकेश टिकैत यांची सुरक्षा का वाढवली? जाणून घ्या कारण!
- काकाला अडकवण्यासाठी मुनव्वर राणांच्या मुलाने स्वत : वर झाडून घेतल्या गोळ्या, यूपी पोलिसांचा मोठा खुलासा
- माणुसकीला काळिमा : 15 हजारांसाठी तब्बल 75 दिवस कोविड रुग्णाचा मृतदेह फ्रीझरमध्ये, आता झाले अंत्यसंस्कार