पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय तपास संस्था मोकाट सुटल्याचा आरोप करत बिगर भाजपाशासित मुख्यमंत्र्यांना ऐक्य साधण्याचे आज पत्र काय लिहिले… आणि या पत्राचा “राजकीय मुहूर्त” साधत पुन्हा एकदा यूपीए चेअरमन पदाचे पिल्लू पुन्हा सुटले…!!Mamata wrote a letter of solidarity to the anti-BJP chief minister; Pawar’s “puppy” of UPA chairmanship released again
ममता बॅनर्जी यांनी आज बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांना देशात भाजप विरोधात एकजूट करण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी प्रामुख्याने केंद्रीय तपास संस्था ईडी, सीबीआय, एनआयए या बिगर भाजपशासित राज्यांमध्ये नेत्यांना कसा त्रास देतात याचे वर्णन केले. हा त्रास टाळायचा असेल तर भाजपचा 2024 च्या निवडणुकीत पराभव करणे अत्यावश्यक आहे आणि त्यासाठी आत्तापासूनच राजकीय बांधणी करावी, असा आग्रह ममता बॅनर्जी यांनी 10 मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.
यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, केसीआर चंद्रशेखर राव, एम. के. स्टालिन, वायएसआर जगन मोहन रेड्डी, नवीन पटनाईक या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. शरद पवार यांना देखील या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे. डाव्या पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात फक्त पिनरई विजयन यांना या पत्रातून वगळण्यात आले आहे. कारण डावे पक्ष ममतांचे राजकीय शत्रू आहेत.
ममता बॅनर्जी यांनी आज पत्र पाठवण्याचा उपक्रम करताच आजच्याच दिवसाचा “राजकीय मुहूर्त” साधत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या यूपीए चेअरमन पदाचे “पिल्लू” पुन्हा सोडून दिले आहे…!! शरद पवार यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा झाला.
या मेळाव्यात शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे, असा ठराव संमत करण्यात आला. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत हा ठराव करण्यात आल्यामुळे त्याला महत्त्व असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.
राऊतांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
परंतु सहाच महिन्यांपूर्वी अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली होती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदा, सामनातील अग्रलेख याद्वारे त्यावेळी तीन-चार दिवस शरद पवारांच्या यूपीए चेअरमनपदाची मागणी लावून धरली होती त्यांच्या या मागणीला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने कोणतीही किंमत दिली नाही.
पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी झटकून टाकली होती. मूळात शिवसेना युपीएची घटक पक्ष नसताना ते अशी मागणी कशी काय करू शकतात?, असा सवाल नाना पटोले यांनी केला होता.
पंजाब गेला, काँग्रेसला डिवचले!!
आता मात्र यूपीएची घटक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या युपीए चेअरमन पदाचा ठराव संमत केला आहे. या खेरीज काँग्रेसची परिस्थिती सहा महिन्यांपेक्षा बदलली आहे. त्यांच्या हातातून पंजाब सारखे मोठे राज्य गेले आहे. अशावेळी काँग्रेसला “कॉर्नर” करण्यासाठीच हे यूपीए चेअरमन पदाचे “पिल्लू” सोडून देण्यात आले आहे…!!
ममता “मोठ्या” होण्याची पवारांना भीती!!
यातले खरे इंगित वेगळे देखील आहे. एकीकडे ममता बॅनर्जी भाजप बिगर भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ऐक्याची हाक देत आहेत. त्यातून त्यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना वगळले आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील जर मुख्यमंत्री एकवटले तर आपले “महत्त्व” काय उरणार…?? या शंकेने शरद पवार त्रस्त झाले असावेत. त्यामुळेच आजचा “राजकीय मुहूर्त” साधत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या युपीए चेअरमन पदाचे “पिल्लू” सोडून दिलेले दिसत आहे…!!
दिल्लीच्या वर्तुळातील चर्चा
अर्थात काँग्रेस जरी पंजाबसारख्या राज्य गमावल्याने धास्तावली असली तरी अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षांपेक्षा त्या पक्षाची ताकद निश्चित जास्त आहे. त्यामुळे पवारांच्या फक्त वयाची ज्येष्ठता लक्षात घेऊन सोनिया गांधी यांच्याकडून यूपीए चेअरमन पद काढून घेऊन ते शरद पवारांकडे सोपवण्याची सुतराम शक्यता नाही.
काँग्रेसचे लोकसभेचे 54 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 5 खासदार आहेत अशा वेळी सिंगल डिजिट खासदार असलेल्या पक्षाचे नेते युपीए चेअरमन कसे होऊ शकतात…??, फक्त वयाच्या ज्येष्ठतेवर…??, असा खोचक असा सवाल दिल्लीच्या राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.
Mamata wrote a letter of solidarity to the anti-BJP chief minister; Pawar’s “puppy” of UPA chairmanship released again
महत्त्वाच्या बातम्या
- बस कंडक्टरकडून अल्पवयीन प्रवासी मुलीचा विनयभंग
- 370 Removal Impact : जम्मू काश्मीर मध्ये देशभरातील 34 लोकांची मालमत्ता खरेदी; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती!!
- Narayan Rane : ठाकरे – पवार सरकारची मुंबई हायकोर्टात माघार; पण सिंधुदुर्ग दौर्यात आदित्य ठाकरेंच्या राणेंवर तोंडी तोफा!!
- शहरातील आमदारांना माेठी विकासकामे करण्यासाठी निधी द्यावा – माधुरी मिसाळ