• Download App
    गोव्यात पक्षविस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या ममतांना मोठा धक्का, तृणमूलच्या पाच सदस्यांचा राजीनामा; जनतेत फूट पाडत असल्याचा केला आरोप । Mamata Banerjees dream of party expansion in Goa Gets Shocked as five Trinamool members Resigns From Party; Accused of dividing the people

    गोव्यात पक्षविस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या ममतांना मोठा धक्का, तृणमूलच्या पाच सदस्यांचा राजीनामा; जनतेत फूट पाडत असल्याचा केला आरोप

    five Trinamool members Resigns : गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एआयटीसी गोवाच्या पाच प्राथमिक सदस्यांनी शुक्रवारी राजीनामे दिले आहेत. त्याचवेळी गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा अवघ्या ३ महिन्यांतच टीएमसीकडून भ्रमनिरास झाला. Mamata Banerjees dream of party expansion in Goa Gets Shocked as five Trinamool members Resigns From Party; Accused of dividing the people


    वृत्तसंस्था

    पणजी : गोव्यात तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पुढील महिन्यात होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या एआयटीसी गोवाच्या पाच प्राथमिक सदस्यांनी शुक्रवारी राजीनामे दिले आहेत. त्याचवेळी गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा अवघ्या ३ महिन्यांतच टीएमसीकडून भ्रमनिरास झाला.

    यादरम्यान, सर्व सदस्यांनी आपले राजीनामे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्याकडे सुपूर्द केले आहेत. दरम्यान, राजीनाम्याचे कारणही नेत्यांनी उघड केले आहे. त्यांच्या राजीनामा पत्रात गोव्यातील लोकांमध्ये फूट पाडण्याचा पक्षाचा हेतू असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळेच पाच प्राथमिक सदस्यांनी तृणमूल काँग्रेसला राम राम केला आहे.

    वास्तविक गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे सप्टेंबरमध्येच टीएमसीमध्ये सामील झाले होते. बंगाल विधानसभा निवडणुकीतील ममता बॅनर्जींच्या कामगिरीने आपण खूप प्रभावित झालो असल्याचे त्यावेळी ते म्हणाले. पक्षात आल्यानंतर तेथील संस्कृती अनुभवल्यावर भाजपचे माजी आमदार लवू मामलतदारांनी पक्षावर जातीयवादी असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यात मतांसाठी हिंदू आणि ख्रिश्चनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत, सप्टेंबरमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील काही स्थानिक नेत्यांसह पक्षात प्रवेश केल्यानंतर केवळ तीनच महिन्यांनी त्यांचा राजीनामा आला आहे.

    Mamata Banerjees dream of party expansion in Goa Gets Shocked as five Trinamool members Resigns From Party; Accused of dividing the people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    उत्तराखंडच्या जंगलात भीषण आग; लष्कराला पाचारण, हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरमधून पाण्याचा मारा

    शरद पवार यांचा इशारा, शशिकांत शिंदेंना अटक सहन होणार नाही; अवघा महाराष्ट्र पेटून उठेल

    राजकारणात मुरलेले पवार काका – पुतण्या “जे” टाळू शकले नाहीत, “ते” तरुण वरूण गांधींनी टाळून दाखविले!!