आर्य समाज मंदिरात कासीम खान याचे शुध्दीकरण करण्यात आले. कासीमने म्हटले आहे की माझे पूर्वज हिंदूच होते. त्यामुळे माझी ही घरवापसी आहे.
विशेष प्रतिनिधी
अलीगढ : अलीगडमधील २६ वर्षांच्या कासीम खान या तरुणाने इस्लाम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला असून कर्मवीर बनला आहे. त्याची पत्नी हिंदू असल्याने त्याने हा निर्णय घेतला असून दोन्ही मुलांनाही हिंदू नावे दिली आहेत. मात्र, कट्टरपंथीयांना घाबरून त्याने पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
Love Azad : Qasim Khan from Aligarh returned home and became Karmaveer
आर्य समाज मंदिरात कासीम खान याचे शुध्दीकरण करण्यात आले. कासीमने म्हटले आहे की माझे पूर्वज हिंदूच होते. त्यामुळे माझी ही घरवापसी आहे. कासीम हा अलीगढमधील झलकारीनगर येथे राहतो. त्याने अनिता नावाच्या मुलीसोबत लग्न केले आहे. कासीम उर्फ कर्मवीरच्या म्हणण्यानुसार त्याने अनिताशी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह करताना निकाह केला नव्हता तर सात फेरेच घेतले होते. त्यानंतर आपल्या कुटुंबियांपासून ते वेगळे झाले. त्यांना सात आणि चार वर्षांची दोन मुले आहेत. कासीमची पत्नी घरात पूजा-पाठ करते. कासीमच्या म्हणण्यानुसार कोणताही धर्म चुकीचा नसतो.
Love Azad : Qasim Khan from Aligarh returned home and became Karmaveer
अनिताशी लग्न झाल्यानंतर त्याला हिंदू धर्मातील रितीरिवाजांची माहिती झाली आणि ते त्याला खूप आवडले. त्यामुळे अंतरात्म्याची आवाज ऐकून त्याने हिंदू धर्मात येण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्यकर्ते नीरज भारद्वाज यांच्याशी संपर्क साधून हिंदू धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु, त्याला गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे शेवटी आर्य समाज मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्याचे शुध्दीकरण करण्यात आले. मात्र, हिंदू धर्म स्वीाकारल्यानंतर त्याला धमक्या येऊ लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे त्याने सुरक्षेची मागणी केली आहे.