विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कर्नाटक विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मगौडा यांच्या मृत्यूची स्वतंत्र एजन्सीमार्फत उच्चस्तरीय चौकशीची केली जावी, अशी मागणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे.
एस.एल. धर्मगौडा यांचा मृतदेह 29 रोजी चिकमंगळूरच्या रेल्वेरुळाजवळ आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केली की, त्यांची हत्या झाली, याचे गूढ कायम आहे. Lok Sabha Speaker Om Birla has called for a high-level probe through an independent agency
आज त्यांना बिर्ला यांनी ट्विटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, त्यांच्या निधनाने मला अपार दुःख झाले आहे. त्यापेक्षा विधान परिषदेत त्यांना दिलेली अपमानास्पद वागणुकीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. लोकशाहीवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.
Lok Sabha Speaker Om Birla has called for a high-level probe through an independent agency
कर्नाटक विधान परिषदेत गोहत्या रोखणारे विधेयकाच्या चर्चेवेळी विरोधी पक्षाने धर्मगौडा यांना अध्यक्षांच्या खुर्चीत बसण्याचा अधिकार नसल्याचे सांगून विरोधकांनी त्यांना खुर्चीवरून दरादरा ओढत आणून सभागृहाबाहेर हाकलून दिले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ संशयास्पद रित्या आढळून आला होता. पोलिसांनी धर्मागौडा यांनी आत्महत्या केल्याची सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बिर्ला यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली आहे.